1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: कोल्हापूर , गुरूवार, 16 एप्रिल 2020 (18:55 IST)

लॉकडाऊनमध्ये लग्नात न येण्यासाठी निमंत्रण : फेसबुकवर पार पडला जवानाचा विवाह सोहळा

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यात या परिस्थितीतही एक लग्न पार पडलं. हा विवाहसोहळा पार पाडत असताना सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आली होती. या लग्नात तब्बल 270 हून अधिक नातेवाईक ऑनलाईन सहभागी झाले होते. याकरिता त्यांनी लग्नाला न येण्याचे निमंत्रण देखील दिले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी या गावातील अविनाश दोरुगडे आणि चंदगड तालुक्यातील कुदनुर गावातील रूपाली निर्मळकर या दोघांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. फक्त पुजारी आणि वधू वर हे तिघेजण याच या लग्नाला उपस्थित होते तेही मास्क बांधून. या तिघांनीही सोशल डिस्टन्स ठेवूनच हा विवाहसोहळा पार पाडला.

महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन फेसबुक अकाउंटवरून 270 व्हराडी या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते आणि त्यांनी ऑनलाईन अक्षता टाकत वधू-वराला शुभेच्छा दिल्या. या जोडप्यांनी लग्नामध्ये जमलेला अहेर मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.