रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 15 मार्च 2020 (16:04 IST)

महाराष्ट्र सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचं राज्य! रुग्णांची संख्या ३२ वर

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 32 वर पोहचला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. औरंगाबादेतील 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता राज्यात 32 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्र आहे.
दरम्यान, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेत आहेत.