शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मार्च 2020 (12:00 IST)

Corona : चार शहरांमध्ये जिम, चित्रपटगृह आदी बंद

राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यानुसार, “पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली.
 
यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याशिवाय आरोग्य विभागाकडून आढावा घेऊन पहिली ते नववी आणि अकरावी ते इतर परीक्षा पुढे ढकलायच्या की नाही यावर चर्चा करु, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.