1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 18 जुलै 2020 (22:13 IST)

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील होम क्वारंटाईन

maharashtra minister
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाले आहे. मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनीच ही माहिती ट्विट करुन दिली आहे. गडाख यांच्या वाहन चालकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 
 
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या पत्नी आणि नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांना कोरोना संक्रमण झाले आहे. यानंतर मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी स्वत:ला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करुन घेतले आहे.
 
१७ जुलै रोजी माझी पत्नी यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून आज शनिवारी माझा स्वब दिलेला आहे. त्यामुळे मी स्वतः होम कोरंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. आपणही आपल्यासह कुटुंबीयांची काळजी घ्या, असे गडाख पाटील यांनी याबाबतची माहिती देताना ट्विटमध्ये म्हटले आहे.