शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 21 एप्रिल 2021 (08:08 IST)

बाजीराव पेशवे यांचे 9 वे वंशज महेंद्र पेशवे यांचे कोरोनामुळे निधन

श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे नववे वंशज महेंद्र पेशवे  यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची तब्येत खालावली आणि मंगळवारी त्यांचे निधन झाले.
 
महाराष्ट्रातील विविध संस्थानिकांच्या परिवारांना एकत्र आणणारी संघटना असलेल्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते. श्रीमंत महेंद्र पेशवे हे बाजीराव पेशवे यांचे 9 वे वंशज होते. त्यांचं पुणे शहरातच वास्तव्य होतं. तसंच महाराष्ट्रातील राजघराण्यांना एकत्र आणत स्थापन करण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते.