गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 4 जून 2020 (10:57 IST)

मुंबईच्‍या ख-या हिरोंनी वाढवली मेयेर व्हिटाबायोटिक्‍सच्‍या मार्फत रोगप्रतिकार शक्‍ती

कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्‍ये मुंबई पोलिस दलाला वेलमॅन व वेलवुमन सप्‍लीमेण्टसचे पाठबळ 
जगभरात कोविड-१९ महामारीचे संकट वाढत असताना आपल्‍यापैकी अनेकांनी घरात राहत घरातूनच काम करण्‍याच्‍या नवीन नियमांशी जुळवून घेतले आहे. पण ही सोय सर्वांनाच अनुभवता येत नाही. आज जवळपास ६५ दिवस झाले आहेत, आपल्‍या शहरातील साहसी पुरूष व महिलांचा समावेश असलेले पोलिस दल कोविड-१९ चा प्रादुर्भावाविरोधात लढण्‍यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. या अदृश्‍य युद्धामध्‍ये ते अग्रस्‍थानी आहेत आणि त्‍यांना या विषाणूचा संसर्ग होण्‍याचा सर्वाधिक धोका देखील आहे. 
 
रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणे ही काळाची गरज आहे. आपल्‍या साहसी मुंबई पोलिसांना साह्य करण्‍याच्‍या उद्देशाने मेयेर व्हिटाबायोटिक्‍सने रोहित शेलटकरच्या ग्रॅण्‍ड मराठा फाऊंडेशनसोबत सहयोगाने त्‍यांना वेलमॅन, वेलवुमन आणि अल्‍ट्रा डी३ अशी रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणारी सप्‍लीमेण्‍ट्स देण्‍याकरिता पुढाकार घेतला आहे. 
 
वेलमॅन हे रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी आणि पुरूषांच्‍या एकूण आरोग्‍यासाठी वैज्ञानिकदृष्‍ट्या सुत्रीकरण करण्‍यात आलेले सप्‍लीमेण्‍ट असून वेलवुमन हे महिलांचे आरोग्‍य व रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी खास तयार करण्‍यात आले आहे. रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणारे वेलमॅनचे ४०००० युनिट्स आणि वेलवुमेनच्या ६००० युनिट्सचे वाटप कंपनी करणार आहे. तसेच संपूर्ण दलाला अल्‍ट्रा डी३ जीवनसत्त्व ड चे ४६००० पॅक्‍सचे देखील वाटप करणार आहे.
 
आपले मत मांडत मेयेर व्हिटाबायोटिक्‍सचे उपाध्‍यक्ष श्री. रोहित शेलटकर म्‍हणाले, ''या महामारीविरोधात लढण्‍यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असलेल्‍या आपल्‍या मुंबई पोलिस दलाला साह्य करणे हे आमच्‍यासाठी अत्‍यंत सौभाग्‍यपूर्ण आहे. वेलमॅन व वेलवुमन टॅब्‍लेट्स वैज्ञानिकदृष्‍ट्या संशोधन करण्‍यात आले आहेत आणि
या टॅब्‍लेट्समधून रोगप्रतिकार शक्‍ती वाढत असल्‍याचे दिसून आले आहे. आम्‍ही या थोर कार्याप्रती कटिबद्ध असलेल्‍या मुंबई पोलिस दलाचे आभार मानतो. आम्‍ही त्‍यांना आमच्या वेलमॅन, वेलवुमन आणि अल्‍ट्रा डी३ सप्‍लीमेण्‍ट्सचा पुरवठा करत त्‍यांची काळजी घेण्‍याप्रती पुढाकार घेतो.''
 
मेयेर व्हिटाबायोटिक्‍स बाब‍त:
मेयेर व्हिटाबायोटिक्‍स ही युकेची पहिल्‍या क्रमांकाची व्हिटॅमिन कंपनी व्हिटाबायोटिक्‍स लिमिटेड भाग असून तिचे मुख्‍यालय लंडनमध्‍ये आहे. कंपनीने आघाडीची फार्मास्‍युटिकल उत्‍पादक म्‍हणून स्‍वत:ची क्षमता सिद्ध केली आहे. कंपनीच्या अग्रणी व्हिटॅमिन व मिनरल सप्‍लीमेण्‍ट्सची रेंज ११० हून अधिक देशांमध्‍ये उपलब्‍ध आहे. वेलमॅन, वेलवुमन, अल्‍ट्रा डी३, परफेक्टिल, प्रेग्‍नाकेअर, मेनोपेस इत्‍यादींसारखी सर्वात प्रख्‍यात उत्‍पादने त्‍यांच्‍या संबंधित विभागांमध्‍ये बाजारपेठ अग्रणी सप्‍लीमेण्‍ट्स आहेत. मेयेर व्हिटाबायोटिक्‍स मानवी आरोग्‍यसेवा, संशोधन वाढवण्‍याप्रती आणि सर्व वयोगटातील व्‍यक्‍तींना न्‍यूट्रिशन सप्‍लीमेण्‍ट्स देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. मेयेर व्हिटाबायोटिक्‍समध्‍ये नेहमीच उत्‍पादन प्रणालीमधील उत्‍पादन तंत्रज्ञान, सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणावर सर्वाधिक भर देण्‍यात आला आहे.