सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (08:03 IST)

खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांना कोरोना

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोविड चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. ते स्वतः उपचारासाठी लीलावती हॉस्पिटल दाखल झाले आहेत.
 
 गेली सहा महिने कोविड मध्ये ते मतदार संघात सक्रीय आहेत.तर मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मतदारसंघाच्या विविध भागांचा पाहणी दौरा केला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी वर्सोवा लोखंडवाला भागाच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासन, स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी केली  होती.
 
दरम्यान खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की,माझी कोविड 19ची तपासणी करून घेतली,ती पॉझिटिव्ह आली.तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने प्रकृती उत्तम आहे व मी इस्पितळात उपचार घेत आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की,आपण योग्य ती काळजी घ्यावी व आवश्यक खबरदारी बाळगावी. त्यांचे गोरेगाव पूर्व आरे रोड येथील स्नेहदीप कार्यालय काही दिवस खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवले असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.