शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (20:48 IST)

मुंबई: विवाह समारंभात कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन केले २ जणांना अटक

मुंबई : मुंबई पोलिसांनी जिमखाना येथील सेक्रेटरी आणि केटरर यांना परिसरात विवाह समारंभात १५० पेक्षा अधिक लोकांचा जमाव  करून  कोविड च्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 
 
अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की पोलिसांनी चेम्बुरच्या छेदानगर येथील जिमखान्यात रविवारी झालेल्या घटनेच्या संदर्भात चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहेत त्यातील 2 जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
त्यांनी सांगितले की बृहन्मुंबई महानगर पालिका(बीएमसी) चे काही अधिकारी तपासणीसाठी गेले होते. त्यांनी तिथे १५० पेक्षा अधिक लोकांचा जमाव बघितला. 
अधिकाऱ्यांनी सांगितले की कार्यक्रमात उपस्थित लोक सामाजिक अंतराच्या निर्देशाचे अनुसरणं करत नव्हते आणि त्यापैकी बऱ्याच लोकांनी मास्क देखील घातले नव्हते.  
त्यांनी सांगितले की नागरी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जिमखाना प्रशासक आणि संयोजकांवर कारवाई सुरू केली. 
टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील काळे ह्यांनी सांगितले की आम्ही जिमखान्याचे सचिव, केटरर, नवरदेवाचा भाऊ आणि कार्यक्रमास उपस्थित असलेल्या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.