1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 18 एप्रिल 2021 (11:45 IST)

अतिशय चिंताजनक! कोरोना संसर्गात नाशिक देशात पहिले; १० लाखांमागे सर्वाधिक बाधित

Nashik first in corona infection; Most affected after 10 lakhs
देशात कोरोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. सध्या राज्यात ६० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहे. राज्यातील प्रमुख चार शहरांमध्ये मार्च महिन्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये दहा लाख लोकांमागे सर्वाधिक नवे कोरोना बाधित नाशिकमध्ये आढळले आहेत. या यादीमध्ये नाशिक अग्रस्थानी असून, त्यानंतर अनुक्रमे नागपूर, पुणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो. पाचव्या स्थानी लखनऊ, सहाव्या बंगळुरू, सातव्या भोपाळ, आठव्या इंदूर, नवव्या पाटणा आणि दहाव्या क्रमांकावर दिल्ली आहे.
नाशिकमध्ये गेल्या महिन्यात दररोज सरासरी ३,९४७ रुग्ण आढळले. तर दहा लाख लोकांमागे  दररोज १,८५९ रुग्ण आढळले. संपूर्ण मार्च महिन्यात ९७,७६५ रुग्ण आढळले आहेत. मार्च महिन्यातील दहा लाख लोकांमागील हा आकडा ४६,०५० इतक्यावर पोहोचला.
१६ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान मुंबईमध्ये ३.७ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. हे कोणत्याही शहरांमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. सर्वाधिक बाधित रुग्णांच्या शहरांमध्ये त्यांनतर दिल्लीचा क्रमांक आहे. काही शहरांमध्ये रुग्णांची आकडेवारी लपवण्यासाठी दिशाभूल करणारे आकडे दिले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक शहरांमध्ये दहा लाख लोकांमागे किती रुग्ण आढळत आहेत हे पाहिल्यास कमी-अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील रुग्णसंख्येची तुलना करता येणार आहे.
मार्चमध्ये मुंबई आणि दिल्लीमधील २० लाख लोकांमागे एका दिवसात अनुक्रमे १९,४०० आणि १४३०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. परंतु १५ एप्रिलला लखनऊला सर्वाधिक ४,५०० रुग्ण आढळले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत हेच प्रमाण सर्वाधिक आहे. यासंदर्भातील वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
(अनुक्रम, शहर, गेल्या महिन्यातील सर्वाधिक बाधित, दहा लाखांमागे बाधित, महिन्याभरातील नवे बाधित आणि दहा लाखांमागे नवे बाधित असे)
१) नाशिक        ३,९४७               १,८५९      ९७,६६५        ४६,०५०
२) नागपूर         ६,५०९               २,२१४     १,३४,८४०       ४५,८५६
३) पुणे               १०,९२०            १,६०४     २, ४७,५२९      ३६,३५९
४) मुंबई             १७,५४९            ८४९        ३,७०,८९६      १७,९४६