शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 29 मार्च 2020 (17:03 IST)

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले जात आहेत. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणून लॉकडाउनही घोषित करण्यात आला आहे.

केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडण्याची  परवानगी देण्यात आली आहे. असे असताना अनेकजण कारण नसतानाही बाहेर पडून नियम मोडत आहेत. त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येत आहे. असे असताना अभिनेते ऋषी कपूर यांनी दारूची दुकानेही सुरू करा अशी मागणी केली आहे.