शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (15:36 IST)

परदेशात जाऊन आलेली सात वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉन तपासणी होणार

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात कुटुंबासह परदेशात जाऊन आलेली सात वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. संबंधित बालिका आई वडिलांसह रशियाला फिरण्यासाठी गेली होती. 28 नोव्हेंबरला हे कुटुंब रशियाहून अंबरनाथला परतलं. त्यानंतर काही दिवसात मुलीला त्रास होऊ लागल्यानं टेस्ट केली असता ती कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाले. मुलीचे वडील निगेटिव्ह असून तिच्या आईच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणं अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे मुलीची आई दोन दिवस ऑफिसलाही जाऊन आली आहे.
 
कोरोना पॉझिटिव्ह मुलीचे नमुने ओमिक्रॉन तपासणीसाठी  लॅबला पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या मुलगी आणि तिचे कुटुंबीय घरीच क्वारंटाईन झाले असून त्यांची इमारत सील करणार असल्याची माहिती पालिकेनी दिली आहे.