शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: पंढरपूर , मंगळवार, 24 मार्च 2020 (13:42 IST)

पुण्यातील वाढत कोरोनाग्रस्तामुंळे पंढरपूरकरांचे ‘टेन्शन' वाढल

increasing tension
विद्येचे माहेर घरओळख असलेल्या पुण्यातच राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून येत असून यामुळे पंढरीत मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण पंढरपूर शहर व तालुक्यातील किमान चार हजार तरूण, तरूणी व निवृत्त कर्मचारी पुण्यात स्थायिक आहेत. ते आता आपल्या गावाकडे परतले आहेत.
 
पंढरीचे पुण्याशी घनिष्ठ नाते आहे. येथील शेकडो तरूण शिक्षणासाठी, नोकरीसाठी तर विवाहित झालेल्या तरूणी पुण्यात वास्तवस आहेत. तर निवृत्त झालेले विविध ज्येष्ठ नागरिक देखील पुण्यात राहण्याला पसंती देतात. असे शहर व तालुक्यातील किमान चार हजार जण तेथे आहेत. कोरोनाच पार्श्वभूमीवर यपैकी शेकडो नागरिक शहर व तालुक्यातील गावांमध्ये वापस आले आहेत. सध्या देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या महाराष्ट्रात असून यामध्ये मुंबई व पुण्याते नागरिक सर्वाधिक नागरिक बाधित आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड येथे सध्या 27 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
सर्वाधिक शिस्त पाळणारे व स्वतःची काळजी घेणारे म्हणूनपुणेकर प्रसिध्द असताना देखील यथेच कोरोनाग्रस्त अधिक आढळून आल्याने राज्यात भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने कोल्हापूर, सातारा, सांगली, उसनाबाद या सोलापूर लगतच्या जिल्ह्यात आप एकही कोरोनाग्रस्त आढळून आला नाही. परंतु पुण्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आल्यामुळे पंढरपूरकरांचे टेन्शन वाढले आहे. शिक्षणाच्या निमित्ताने किमान एक हजार विद्यार्थी, नोकरीच्या निमित्ताने दोन हजार तर लग्न झालेलल्या तरूणी, निवृत्त कर्मचारी व मुलाकडे राहण्यासाठी गेलेले वृध्द माता पिता यांची एक हजार  संख्या आहे. यामुळेच एका दोघास लागण झाली असेल तर पंढरीवर कोरोनाचे संकट ओढवेल. यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे.