सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (09:16 IST)

कोरोना चाचण्या लॅब ची संख्या वाढली, संख्या १०३

राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्या १०३ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत. २६ मे ते २० जून दरम्यानच्या काळात प्रयोगशाळांची संख्या ३० ने वाढ झाली आहे. यामुळे आता प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
२६ मे रोजी राज्यात ७३ प्रयोगशाळा होत्या त्यावेळी प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ३ हजार ३४७ एवढे होते. २९ मे रोजी ७७ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ३३८७ होते. ५ जून रोजी राज्यात ८३ प्रयोगशाळा होत्या तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ४०८६ एवढे होते. १२ जून रोजी ९५ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाणे ४८६१ एवढे होते. २१ जून रोजी १०३ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ५८४७ एवढे आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 
राज्यातील प्रयोगशाळांची संख्या
मुंबई- 27(शासकीय 12, खासगी 15), ठाणे- 7(शासकीय 2, खासगी 5), नवी मुंबई- 3(शासकीय 1, खासगी 2), पुणे- 22, (शासकीय 10, खासगी 12), नागपूर- 11(शासकीय 7, खासगी 4), कोल्हापूर- 3(शासकीय 2, खासगी 1), नाशिक- 4(शासकीय 2, खासगी 2), सातारा- 2(शासकीय 1, खासगी 1),  अहमदनगर- 2 (शासकीय 1, खासगी 1), पालघर (डहाणू)- 1, रत्नागिरी -1, सिंधुदूर्ग- 1,सांगली (मिरज)- 1, सोलापूर- 2, धुळे-