मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (14:21 IST)

प्रतीक्षा संपली,पुढच्या महिन्यापासून मुलांची कोविड लस भारतात येऊ शकते-आरोग्यमंत्री

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम सर्वाधिक मुलांवर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी सांगितले आहे की ऑगस्ट महिन्यातच मुलांसाठी अँटी-कोरोना लस भारतात येऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी झालेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.आत्तापर्यंत, देशात केवळ 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना अँटी-कोरोना लस दिली जात आहे.
 
अहवालानुसार आरोग्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले की, सरकार पुढच्या महिन्यापासून मुलांना लसीकरण करण्यास सुरवात करेल.तज्ञांच्या मते,कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आणि शाळा पुन्हा उघडण्यासाठी मुलांना लस देणे हे एक मोठे पाऊल असल्याचे सिद्ध होऊ शकते. 
 
आतापर्यंत सप्टेंबर महिन्यापर्यंत देशातील मुलांसाठी कोरोनाची लस येण्याची शक्यता होती. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देखील या पूर्वी म्हटले होते की सप्टेंबरपर्यंत देशात लसीकरण सुरू केले जाऊ शकते. 
 
ते म्हणाले की यामागील कारण म्हणजे झेडस कॅडिला यांनी चाचणी केली आहे आणि आपत्कालीन वापरासाठी मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सीन चाचणी ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत मुलांवरही पूर्ण केली जाऊ शकते. त्याच वेळी, फायझरच्या लशीला आपत्कालीन वापरास यूएस नियामक कडून मान्यता मिळाली आहे. अशा परिस्थितीत सप्टेंबरपर्यंत भारतात मुलांना लसी देण्याची मोहीम सुरू होईल,अशी अपेक्षा आहे.
 
आतापर्यंत देशात एंटी-कोरोना लसीचे 44 कोटी डोस देण्यात आले आहेत. या वर्षाच्या अखेरीस देशातील संपूर्ण प्रौढ व्यक्तींना लसी देण्याची केंद्र सरकारची योजना आहे.