1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (08:29 IST)

राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांती संख्या अधिक

राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. परंतु एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांती संख्या अधिक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल १३ हजार ४०८ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. तर दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या आता ३ लाख ८१ हजार ८४३ इतकी झाली आहे.
 
बुधवारी राज्यात १२ हजार ७१२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ४८ हजार ३१३ वर पोहोचली आहे. राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ५१३ अॅक्टिव्ह केसेस आहे.
 
दुसरीकडे राज्यात चोवीस तासांमध्ये ३४४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात १८ हजार ६५० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून तो आता ६९.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे.