1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (08:36 IST)

ईथे अजूनही आहे संपूर्ण लॉकडाऊन

नाशिकच्या येवला तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत दिवसगणिक वाढ होत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यातच आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे तीन दिवसांपासून पारेगाव संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. येवल्यात सध्या ८९ अॅक्टिव्ह कोरोनाबाधित असून, त्यातील १६ रुग्ण हे येवला शहरातील आहेत. दरम्यान, पारेगावात १० कोरोनाबाधित आढळून आल्याने तीन दिवसांपासून गावातील व्यवहारांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे येवला पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरते की काय, अशी भीती व्यक्त केली जातेय.