1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (08:30 IST)

वाचा, यामुळे कोरोना लस येण्यासाठी उशीर होऊ शकतो

माकडांना कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी विशेष प्रकारचे एनिमल बायोसॅफ्टी लेव्हल -3 लॅब आवश्यक आहे. यूएस मध्ये अशा लॅबची संख्या मर्यादित आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी माकडे खूप उपयुक्त आहेत. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती माणसांइतकीच आहे. त्यामुळे आता माकडांची कमतरता निर्माण झाल्यामुळे कोरोनावर लस येण्यास विलंब लागू शकतो.
 
कोरोना महामारीमुळे माकडांची मागणी वाढली आहे. परंतु चीनकडून आत माकडांचा पुरवठा होत नाही. मागील वर्षी अमेरिकेत आयात केलेल्या ३५ हजार  माकडांपैकी ६० टक्के माकडे चीनमधून पाठविण्यात आले होते. पण कोरोना विषाणूमुळे चीनने माकडांची निर्यात बंद केली. त्यामुळे माकड मिळत नाही असे सांगण्यात आले आहे. 
 
कॅलिफोर्नियाच्या नॅशनल प्राइमेट रिसर्च सेंटरच्या कोईन व्हॅन रोम्पे यांनी सांगितले की राष्ट्रीय स्तरावर माकडांची मोठी कमतरता आहे. बायोक्वाल या संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क लुईस म्हणाले की आम्हाला आता रेसस वानर मिळत नाहीत. ते पूर्णपणे अदृश्य झाले आहेत.