शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (17:08 IST)

हा नवीनच इव्हेंट काढला : जितेंद्र आव्हाड

येत्या ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले दिवे बंद करून साधा दिवा किंवा टॉर्च किंवा मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅश लाईट लावण्याचं आवाहन केलं. कोरोनाविरोधात सगळ्या देशवासियांची एकजूट यातून दिसेल, असंही ते म्हणाले. पण मोदींचं हे आवाहन महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोदींच्या आवाहनावर सडकून टीका केली आहे.
 
राज्याते गहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींच्या आवाहनावर टीका करताना म्हटलंय, ‘प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट करायचा प्रकार म्हणजे तद्दन मूर्खपणा, बालिशपणा, नादानपणा आहे. मी माझ्या घरातली लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी मूर्ख नाही’, असं म्हणतानाच आव्हाडांनी मोदींवर टीका केली. ‘संपूर्ण देशाला आशा होती की मोदीसाहेब जीवनावश्यक वस्तू, नागरिक उपाशी झोपणार नाही, मास्क-सॅनिटायझर आणि औषधे यांच्या तुटवड्यावर; आम्ही नवीन लस शोधून काढतोय; टेस्टींग किट कमी पडणार नाहीत, यावर बोलतील. देशामध्ये अवघड परिस्थीती  आणि भयग्रस्त जनतेला आधार देण्याबाबत बोलतील, असे वाटले होते. पण, त्यांनी नवीनच इव्हेंट काढला’, असं ते म्हणाले.