शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (15:05 IST)

कोरोना रुग्णसंख्या वाढली तर विचार करावा लागेल : अजित पवार

ajit pawar
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या रुग्णसंख्येबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर इशारा दिला आहे. कोरोना  रुग्णसंख्या वाढली तर विचार करावा लागेल, असे अजिदादा म्हणाले.  नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
 
यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला. काही नेते मास्क वापरत नव्हते तर दुसऱ्यांदा कोरोना झाला. आता अडचण झाली आहे. काही जन ऑपरेशन करायला गेले तर त्याचे ऑपरेशन झाले नाही.  त्यामुळे प्रत्येकाची आरोग्य महत्वाचे असते हे लक्षात घ्या, अजित पवार म्हणाले.