रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 7 जून 2020 (09:18 IST)

दोन ते तीन महिन्यात करोनावर लस येण्याची शक्यता

आगामी दोन ते तीन महिन्यात करोनावर लस येण्याची शक्यता आहे असा अंदाज एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. भारताची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे करोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र येत्या दोन ते तीन महिन्यात करोनावरची लस शोधण्यात यश मिळेल अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
 
कोरोना रुग्णांचा  मृत्यू दराचा विचार केला तर जगाच्या तुलनेत भारताचं हे प्रमाण नक्कीच कमी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे.. त्यामुळे येणाऱ्या काळात काही केसेस वाढतील असंही गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
 
लॉकडाउनच्या अटी आता हळूहळू शिथिल होत आहेत. अशावेळी आपल्या देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे. बाहेर जाताना मास्क लावणं, हात धुणं, हँड सॅनिटायजरचा वापर करणं या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्याच लागतील. लॉकडाउन संपला म्हणजे करोनाचा धोका टळला असे नाही. लॉकडाउनच्या अटी शिथिल होऊ लागल्या असल्या तरीही करोना व्हायरस आहेच. त्यामुळे देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे असे सांगितले.