testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बांग्लादेश म्हणते...भारताचा चिडीचा ‘डाव’

दिल्ली| Last Modified शुक्रवार, 20 मार्च 2015 (14:46 IST)
वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारत आणि बांग्लादेश यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यावेळी पंचांनी मुद्दामून भारताकडून निर्णय दिले, वर्ल्डकप भारताने जिंकावा यासाठीच हा कट रचण्यात आल्याचा आरोप बांगलादेश क्रिकेट बोडार्चे माजी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी केला आहे.
या सामन्यात पंचांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले असा आरोप करुन मुस्तफा कमाल म्हणाले, बांग्लादेश क्रिकेट बोडार्नेही पंचांच्या निर्णयाविरोधात आयसीसीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा ९० धावांवर असताना फुलटॉस चेंडू टोलवण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला होता.मात्र पंचांनी तो नो बॉल ठरवले व रोहितला जीवदान मिळाले. महमदुल्लाहचा शिखर धवनने सीमारेषेजवळ टिपलेला झेल वादग्रस्त ठरला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये पंचांनी चुकीचे निर्णय दिल्याने बांग्लादेश पराभूत झाल्याची बांग्लादेशी क्रिकेटप्रेमींना वाटते. ढाकामध्ये सामन्यातील पंचांविरोधात निदर्शनंही करण्यात आली.


यावर अधिक वाचा :