testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भारताच्या पराभवाची कारणे..

team india
Last Modified शुक्रवार, 27 मार्च 2015 (11:06 IST)
* ऑस्ट्रेलिाविरुध्दची लढत सोपी नव्हती, परंतु असा एकतर्फी पराभव अपेक्षित नव्हता.
* नाणेफेकीत हार : नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली. ऑस्ट्रेलिया 350 धावा करेल, असेच वाटत होते. मात्र भारती गोलंदाजांनी 328 वर त्यांना रोखले. अर्थात ही धावसंख्या मोठीच होती.

* भारताला उशिरा यश : वॉर्नरला भारताने झटपट बाद केले, मात्र स्टीव्हन स्मिथने 93 चेंडूत 105 धावा काढल्या.

* फलंदाजी : ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ही त्यांची शक्ती ठरली. 33व्या षटकाअखेर 1 बाद 181 वर असणार्‍या कांगारूंची अवस्था 43 व षटकात 5 बाद 250 झाली. मात्र जॉन्सनचे 9 चेंडूत 27, फॉल्कनरचे 12 चेंडूत 21 व फिंचच्या 81 धावांमुळे त्यांनी डोंगर रचला.
* गोलंदाजी ढेपाळली : भारताची गोलंदाजी महत्त्वाच्या टप्प्यावर ढेपाळली. डेथ ओव्हर्समध्ये शमी अपयशी ठरला, अश्विन वगळता सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले. यंदाच्या विश्वचषकात गोलंदाजांना सर्व 10 बळी मिळविता आले नाहीत.

* आघाडीची फळी अपयशी : 328 धावांचे आव्हान असताना पहिले तीन फलंदाज खेळणे आवश्क होते. रोहित व शिखरपैकी एकाने 70 पेक्षा जास्त धावा करणे गरजेचे होते.
* मधली फळीदेखील कोसळली : 18 षटकात 3 बाद 91 नंतर कोणीतरी एकाने टिच्चून फलंदाजी करणे आवश्क होते. रहाणे 44 व धोनी 65 यांनी प्रतिकार केला, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सातत्याने दबाव ठेवत भारतासाठीची आवश्यक धावगती अशक्यप्राय करून ठेवली.यावर अधिक वाचा :