शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2015
Written By
Last Modified: सिडनी , गुरूवार, 26 मार्च 2015 (10:32 IST)

आज अग्निपरीक्षा

विश्वचषक स्पर्धेत एकापाठोपाठ विजय मिळविणार्‍या धोनी ब्रिगेडला आज ऑस्ट्रेलियाविरुध्द अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. रविचंद्रन अश्विनचा ‘कॅरम बॉल’ आणि ग्लेन मॅक्सवेलचे ‘पारोटेक्निक’ यामध्ये ही लढत रंगणार आहे.
 
1 सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारत-ऑस्ट्रेलिातील 13 लढतींपैकी भारताने 1 लढत जिंकली आहे. भारताच्या विजय-पराभवाचे प्रमाण आहे 0.083.
 
10-30 ऑस्ट्रेलिात ऑस्ट्रेलिाविरुध्द खेळताना भारताचे विजय-पराभवाचे हे सूत्र. अँडलेड ओव्हलवर 2012 मध्ये भारत विजयी झाला होता.
 
0 विश्वचषक उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलिया शून्यवेळा पराभूत झाला आहे. 1999 मध्ये ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना बरोबरीत संपला होता.
 
5 डेव्हिड वॉर्नरने सिडनीत 8 पैकी 5 सामन्यात अर्धशतक काढले आहे. वॅटसनची या मैदानावर सरासरी आहे 45.81 तर क्लार्कची सरासरी आहे 47.80
 
8-2 सिडनी मैदानावर गेल 10 वन डे मध्ये ऑस्ट्रेलियाने 8 सामने जिंकले आहेत.
 
1-9 सिडनीत प्रथम फलंदाजी घेणार्‍या संघाचे विजय-पराभवाचे सूत्र.
 
18.14 ऑस्ट्रेलियाविरुध्द सिडनीत भारतीय आघाडीवीरांची सरासरी.
 
81.92 विश्वचषकात 11 ते 40 षटके खेळताना भारतीय फलंदाजांची सरासरी.
 
0 बॅटिंग पॉवर प्लेमध्ये भारताने एकही विकेट गमावलेली नाही.
 
21.64 विश्वचषकात भारतीय गोलंदाजीची सरासरी.
 
41 मिशेल जॉन्सनने भारताविरुध्द वन डे मध्ये घेतलेल्या विकेटस. जॉन्सनने रैनाला पाच वेळा बाद केले आहे.
 
18.80 विराट कोहलीची ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिाविरुध्द खेळताना सरासरी.
 
1-1 विश्वचषक लढतीत ऑस्ट्रेलिाविरुध्द भारताची कामगिरी 2003 च्या अंतिम सामन्यात भारत पराभूत झाला होता तर 2011 मध्ये   भारताने उपान्त्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियास पराभूत केले होते.
 
75.00 ग्लेन मॅक्सवेलची भारताविरुध्द खेळतानाची सरासरी.