शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2015
Written By
Last Modified: मेलबर्न , सोमवार, 23 फेब्रुवारी 2015 (10:56 IST)

‘अजिंक्य’ खेळीने गाठले भारताने विजयाचे ‘शिखर’

शिखर धवनचे झंझावाती शतक आणि भारती फलंदाजांनी केलेली सुरेख कामगिरी याच्या जोरावर भारताने रविवारी बलाढय़ दक्षिण आफ्रिकेचा 130 धावांनी दणदणीत पराभव करून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला.
 
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच पराभूत केले आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या विजामुळे भारत ‘ब’ गटात अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आता भारताला आयर्लड, झिम्बाब्वे आणि संयुक्त अरब अमिरात या दुबळ्या संघांविरुध्द खेळायचे आहे. आता गटामध्ये भारताला फक्त वेस्ट इंडीजविरुध्द थोडीशी झुंज द्यावी लागेल. 
 
धवनच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 137 धावांमुळे भारताने 7 बाद 307 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला 40.2 षटकात 177 धावात गुंडाळून भारताने खचाखच भरलेल्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर या स्पर्धेतील मोठा विजय साजरा केला. साखळीतील दोन विजयामुळे भारताला गटामध्ये अव्वलस्थान पटकावित उपान्त्यपूर्व फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. तिरंगी मालिका आणि तत्पूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात   खराब कामगिरी करणार्‍या भारतीय खेळाडूंनी जोरदार कमबॅक करत या मोठय़ा स्पर्धेत सुरेख विजय मिळविले आहेत.