1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By

काय खरंच रवी शास्त्रीच्या पायाजवळ दारूची बाटली होती.....

Ravi Shastri Trolled
सोशल मीडियावर टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्रीचा एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये रवी शास्त्री पूर्ण भारतीय संघासोबत दिसत आहे. यूजर्स फोटो शेअर करत रवी शास्त्रीच्या खुर्ची खाली आणि त्याच्या पायाजवळ बघण्यासाठी सांगत आहे. फोटोमध्ये भारतीय क्रिकेट कोचच्या पायाजवळ एक बाटली ठेवलेली दिसत आहे. कोणी याला स्कॉचची तर कोणी वाइनची बाटली असल्याचं म्हणत आहे परंतू याचा उद्देश्य एकच आहे रवी शास्त्रीला ट्रोल करणे.
 
खरं काय आहे?
या फोटोमध्ये पूर्ण भारतीय संघ दिसत आहे म्हणून सर्वात आधी बीसीसीआय (BCCI) च्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर व्हायरल फोटो शोधण्यात आला असून तो सापडला देखील.
BCCI ने हा फोटो 6 जुलै रोजी ट्विट केला होता.
 
या फोटोत रवी शास्त्रीच्या पायाजवळ कुठलीही बाटली नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. अर्थात फोटो एडिट करून बाटली जोडण्यात आली आहे.


 
सोशल मीडियाला अनेकदा या प्रकारे दावा आणि फोटोशॉप्ड फोटोद्वारे टार्गेट करण्यात येतं.