1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (19:50 IST)

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्मा पोहोचली अहमदाबाद

india pakistan cricket
भारत आणि पाकिस्तानचे संघ शनिवारी  विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत सात सामने झाले आहेत. टीम इंडियाने सर्व सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हे पाहण्यासाठी बड्या व्यक्ती अहमदाबादला पोहोचत आहेत.
 
भारतीय संघाच्या बहुतांश सामन्यांच्या वेळी विराट कोहलीची पत्नी अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित असते. अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये ती सचिन तेंडुलकर आणि दिनेश कार्तिकसोबत होती. 
 
प्रसिद्ध गायक अरिजित सिंगही अहमदाबादला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो परफॉर्म करणार आहे. अरिजित वर्षभरात दुसऱ्यांदा या स्टेडियममध्ये परफॉर्म करणार आहे. याआधी तो आयपीएल 2023 च्या ओपनिंग मॅचपूर्वी दिसला होता.
 
या तीन गायकांव्यतिरिक्त, मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचतील. त्याचवेळी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही स्टेडियममध्ये राहून हा सामना पाहणार आहे.
 




Edited by - Priya Dixit