बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Updated : बुधवार, 10 एप्रिल 2024 (12:52 IST)

संत रामदासांचे अभंग 1 ते 271

संत रामदासांचे अभंग 1 ते 50
समुदाय काय सांगों श्रीरामाचा ।
‌अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी ।‌
सर्वही राज्यासी त्यागियेले त्यागियेले अन्न केले उपोषण ‌‌।
धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक‌ ।
श्रीरामी सार्थक जन्म केला जन्म केला धन्य वाल्मीकी ऋषीने ।
धन्य ती वचने भविष्याची भविष्य पाहता धन्य बिभीषण राघवी शरण ।
सर्व भावे सर्व भावे सर्व शरण वानर‌‌ धन्य ते अवतार ।
विबुधांचे विबुधां मंडण राम सर्व गुण‌‌ ‍‌‌अनन्य शरण रामदास ।
 
काळ जातो क्षणक्षणा ‌ मूळ येईल मरणा‌ कांहीं धावाधाव करी ।
जंव तो आहे काळ दूरी ‌ मायाजाळी गूंतले मन।
परि हे दुःखासी कारण सत्य वाटते सकळ।
परि हे जाता नाही वेळ रामीरामदास म्हणे।
आता सावधान होणें।
 
ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं ।
देवा तुझी भेटी केंवि घडे भिन्न उपासना भिन्न संप्रदाव ।
एकमेकां सर्व निंदिताती पंडितां पंडितां विवाद लागला ।
पुराणिकां जाला कलह थोर वैदिकां वैदिक भांडती निकुरें ।
योगी परस्परें भांडताती स्वजाति विजाति भांडण लागलें ।
दास म्हणे केलें अभिमानें
 
देह हे असार क्रुमींचें कोठार ।
परी येणे सार पाविजे तें देहसंगे घडे संसारयातना ।
परी हा भजना मूळ देही देहाचेनि संगे हिंपुटी होईजे ।
विचारें पाविजे मोक्षपद देहसंगें भोग देहसंगे रोग ।
देहसंगे योग साधनांचा देहसंगे गती रामदासीं जाली ।
संगति जोडली राघवाची
 
अनित्याचा भ्रम गेला ।
शुध्द नित्यनेम केला नित्यानित्य हा विचार ।
केला स्वधर्म आचार देहबुध्दी अनर्गळ ।
बोधे फिटला विटाळ रामदासी ज्ञान झाले आणि स्वधर्मा रक्षिलें
 
घात करुनी आपला ।
काय रडशील पुढिलां बहुत मोलाचें आयुष्य ।
विषयलोभें केला नाश नाही ओळखिलें सत्या ।
तेणें केली ब्रह्महत्या रामीरामदास म्हणे ।
भुलों नको मूर्खपणे
 
धातुवरी आला मळ ।
तेणें लोपलें निर्मळ शेतीं न जाता आउत ।
तेणें आच्छादिले शेत मुखे न होतां उच्चार ।
तेणे बुडें पाठांतर नाहीं दिवसाचा विचार ।
दास म्हणे अंधकार
 
ऐसा कैसा रे परमार्थ ।
जळो जळो जिणें व्यर्थ युक्ताहार करवेना ।
निद्रा आली धरवेना मन चंचळ आवरेना ।
नीच उत्तर साहवेना रामदास म्हणे भावे ।
स्थूल क्रियेस नब जावे
 
वैद्य भेटला सुखदाता ।
रोगपालट जाला आतां रस ओतीला कानांत ।
येउनि झोंबला नयनांत रस भरला सांदोसांदीं ।
देही पालट जाली बुध्दि दिव्य देही ओतिला रस ।
गुरु न्याहाळी रामदास
 
प्रव्रुत्ति सासुर निव्रूत्ति माहेर ।
तेथे निरंतर मन माझे माझे मनी सदा माहेर तुटेना ।
सासुर सुटेना काय करुं काय करूं मज लागला लौकिक ।
तेणें हा विवेक दुरी जाय दुरी जाय हित मज चि देखतां ।
यत्न करूं जातां होत नाहीं होत नाहीं यत्न संतसंगेविण ।
रामदास खुण सांगतसे
 
ईंद्रासी उद्वेग सर्वकाळ मनीं ।
माझे राज्य कोणी घेईना कीं घेईना कीं कोणी बळिया दानव ।
घालिना कीं देव कारागृहीं कारागृह देवादिकांचे चुकेना ।
तेथे काय जनां चुकईल चुकईल भोग हें कईं घडावें ।
लागेल भोगावें केलें कर्म केले कर्म तुटे जरी भ्रांति फिटे ।
दास म्हणे भेटे संतजन।
 
तेचि जाणावे सज्जन ।
जयां शुध्द ब्रह्मज्ञान कर्म करिंती आवडी ।
फळाशेची नाही गोडी शांति क्षमा आणि दया ।
सर्व सख्य माने जया हरिकथा निरुपण ।
सदा श्रवण मनन बोलासारिखें चालणें ।
हींचि संतांचीं लक्षणें एकनिष्ठ उपासना ।
अतितत्पर भजना स्वार्थ सांडूनियां देणें ।
नित्य तेंचि संपादणें म्हणे रामीरामदास ।
जया नाहीं आशापाश।
 
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी ।
नि:संदेह मनी सर्वकाळ आवडीने करी कर्मउपासना ।
सर्वकाळ ध्यानारूढ मन पदार्थांची हानी होतां नये काही ।
जयाची करणी बोलाऐसी दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य ।
जयाचा अनन्य समुदाव ।
 
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधू ।
भूतांचा विरोधू जेथ नाही कल्पनेचा देहो त्या नाही संदेहो ।
सदा नि:संदेह देहातीत जया नाही क्रोध जया नाही खेद ।
जया नाही बोध कांचनाचा रामदास म्हणे साधूची लक्षणें ।
अति सुलक्षणें अभ्यासावी।
 
बोलण्यासारिखे चाले जो सज्जन ।
तेथें माझे मन विगुंतलें नाही अभिमान शुध्द ब्रह्मज्ञान ।
तेथे माझे मन विगुंतले व्रुत्ति उदासीन स्वधर्मरक्षण ।
तेथे माझे मन विगुंतलें पूर्ण समाधान सगुण भजन ।
तेथे माझे मन विगुंतलें दास म्हणे जन भावार्थ – संपन्न।तेथे माझे मन विगुंतलें ।
 
धन्य ते भाविक वंदिती हरिदास ।
तयां ह्रषीकेश वंदितसे धन्य तें निंदक निंदिती सज्जन ।
येणें भावें घडे ध्यान त्यांचें धन्य दास दासी सज्जन सेवेसी ।
ते सुरवरांसी वंद्य होती।
 
जाणावा तो नर देवचि साचार ।
वाचे निरंतर रामनाम सगुणी सद्भाव नाही ज्ञानगर्व ।
तयालागी सर्व सारखेचि निंदकां वंदकां संकटी सांभाळी ।
मन सर्वकाळी पालटेना पालटेना मन परस्त्रीकांचनी ।
निववी वचनी पुढिलांसीं पुढिलांसी नाना सुखें देत आहे ।
उपकारीं देह लावितसे लावितसे देह राम भजनासी ।
रामीरामदासीं रामभक्त।
 
देव अभक्तां चोरला ।
आम्हां भक्तां सांपडला भेटीं जाली सावकाश ।
भक्ता न लागती सायास पुढे विवेक वेत्रपाणी ।
वारी द्रुश्याची दाटणी रामदासाचे अंतर ।
देवापाशी निरंतर।
 
ऐसा कोण संत जो दावी अनंत ।
संदेहाचा घात करुं जाणे आढळेना जया आपुले पारिखें ।
ऐक्यरूप सुखें सुखावला धन्य तेचि जनीं जें गुणें बोधिले ।
दास म्हणे जाले पुरुष ते
 
जंव तुज आहे देहाचा संबंध ।
तंव नव्हे बोध राघवाचा राघवाचा बोध या देहावेगळा।
देह कळवळा तेथें नाही नांदतसे सदा जवळी कळेना ।
कदा आकळेना साधुविण कांहीं केल्या नव्हे साधुसंतांविण ।
रामदास खूण सांगतसे।
 
पाहतां दिसेना तेंचि बरें पाहे ।
तेथें रुप आहे राघवाचें निराकार राम देखतां विश्राम ।
दुरी ठाके श्रम संसारींचा सर्वकाळ रामदर्शन होतसे ।
निर्गुणीं विश्वासें मन माझें संतसंगें घडे नि:संगाचा संग।
राघवाचा योग रामदासीं।
 
देव जवळी अंतरीं ।
भेटिं नाहीं जन्मवरी भाग्यें आलें संतजन ।
जालें देवाचे दर्शन मूर्ति त्रैलोक्यीं संचली ।
द़ष्टि विश्वाची चुकली रामदासीं योग जाला ।
देहीं देव प्रगटला
 
आम्ही अपराधी अपराधी ।
आम्हां नाही द्ढ बुध्दि माझे अन्याय अगणित ।
कोण करील गणित मज सर्वस्वे पाळिलें ।
प्रचितीने संभाळिलें माझी वाईट करणी ।
रामदास लोटांगणीं ।
 
पतितपावना जानकीजीवना ।
वेगी माझ्या मना पालटावें भक्तीची आवडी नाहीं निरंतर ।
कोरडे अंतर भावेविण माझें मीतूपण गेलें नाहीं देवा ।
काय करु ठेवा संचिताचा रामदास म्हणे पतिताचे उणे ।
पतितपावनें सांभाळावें।
 
पतितपावना जानकीजीवना ।
वेगीमाझ्या मना पालटावें वैराग्याचा लेश नाहीं माझें अंगी ।
बोलतसें जगीं शब्दज्ञान देह हें कारणीं लावावें नावडे ।
आळस आवडे सर्वकाळ रामदास म्हणे लाज तुझी तुज ।
कोण पुसे मज अनाथासी।
 
पतितपावना जानकीजीवना ।
वेगीं माझ्या मना पालटावें मन हे चंचळ न राहे निश्चळ ।
निरुपणीं पळ स्थिरावेना सांडुनियां ध्यान विषयचिंतन ।
करितसे मन आवरेना रामदास म्हणे कथा निरुपणे ।
मनाची लक्षणे जैसीं तैसीं
 
पतितपावना जानकीजीवना ।
वेगी माझ्या मना पालटावें मुखें बोले ज्ञान पोटीं अभिमान ।
पाहे परन्यून सर्वकाळ द्रुढ देहबुध्दी तेणें नाहीं शुध्दि ।
जाहलों मी क्रोधी अनावर रामदास म्हणे ऐसा मी अज्ञान ।
सर्व ब्रह्मज्ञान बोलोनियां
 
पतितपावना जानकीजीवना ।
वेगीं माझ्या मना पालटावें मिथ्या शब्दज्ञाने तुज अंतरलों।
संदेहीं पडलों मीपणाचें सदा खळखळ निर्गुणाची घडे ।
सगुण नावडे ज्ञानगर्वे रामदास म्हणे ऐसा मी पतित ।
मीपणें अनंत पाहों जातां
 
बिभिषण भावें शरण आला परी ।
तुज सिंधुतीरीं ऐकुनिया तात्काळचि तुवां आश्वासिलें त्यासी।
तैसें हें आम्हासीं कैचे रामा धारिष्ट आमुचें पाहे सर्वोत्तमा ।
कलियुगींचे रामा दास तुझे दर्शन सुग्रीवा आधीं सौख्य दिले।
मग तेणे केले दास्य तुझे तुजलागीं प्राण वेंचिलें वानरीं ।
परि तूं धनुर्धारी पाठीराखा तुझे रुप द्रुष्टीं नसोनियां ठावें ।
नामीं सर्वभावें विश्वासलों सकळांहूनि साना रामदास जालों ।
परिवारेंसि आलो शरण तुज।
 
रामा तुझ्या स्वामीपणे ।
मानी ब्रह्मांड ठेंगणें तुजविण कोण जाणे ।
अंतर आमुचें तुजविण मज माया।
नाहीं नाहीं रामराया आम्हां अनाथां कासयां ।
उपेक्षिसी तुज समुदाय दासांचा ।
परि आम्हां स्वामी कैंचा तुजसाठीं जिवलगाचा ।
संग सोडिला सगुण रघुनाथ मुद्दल ।
माझें हेंचि भांडवल ।
 
माझा देह तुज देखतां पडावा ।
आवडी हें जीवा फार होती फार होती परी पुरली पाहतां ।
चारी देह आतां हारपले सिध्द जालें माझें मनीचें कल्पिले ।
दास म्हणे आलें प्रत्ययासी।
 
काळ जातो क्षणक्षणा ।
मूळ येईल मरणा काहीं धांवाधांव करी ।
जंव तो आहे काळ दुरी मायाजाळीं गुंतलें मन ।
परि हें दु:खासि कारण सत्य वाटतें सकळ ।
परि हें जातां नाहीं वेळ रामींरामदास म्हणें ।
आतां सावधान होणें।
 
नदी मर्यादा सांडती ।
उष्णकाळीं वोसावती तैसा तारूण्याचा भर ।
सवें होतसे उतार भाग्य चढे लागवेगैं ।
सवेंचि प्राणी भीक मागे रामदास म्हणे काळ ।
दोनी दिवस पर्वकाळ
 
पुरें पट्टणें वसती ।
एक वेळ ओस होती तैसे वैभव हें सकळ ।
येतां जातां नाहीं वेळ बहुत स्रुष्टीची रचना ।
होय जाय क्षणक्षणा दास म्हणे सांगों किती ।
आले गेले चक्रवर्ती 
 
सांजे ओसरतां सांत ।
वांया करावा आकांत तैसीं सखीं जिवलगें ।
जाती एकमेकांमागें चारी दिवस यात्रा भरे ।
सवेंचि मागुति ओसरे पूर्ण होतां महोत्साव ।
फुटे अवघा समुदाव बहू वह्राडी मिळाले ।
जैसे आले तैसै गेले एक येती एक जाती ।
नाना कौतुक पाहती रामीरामदास म्हणे ।
संसारासी येणे जाणे।
 
एकीकडे आहे जन ।
एकीकडे ते सज्जन पुढें विवेकें वर्तावे ।
मागे मूळ सांभाळावें उदंड झाला समुदाय ।
तरि आदि सांडू नये रामीरामदास म्हणे ।
जनीं मान्य हें बोलणें।
 
प्रपंच सांडुनिया बुध्दी ।
जडली परमार्थ उपाधि मना होईं सावचित्त ।
त्याग करणें उचित संप्रदाय समुदाव ।
तेणें जडे अहंभाव रामदास म्हणे नेमें ।
भिक्षा मागणें उत्तम।
 
नको ओळखीच जन ।
आंगी जडे अभिमान आतां तेथें जावें मना ।
जेथे कोणी ओळखेना लोक म्हणती कोण आहे ।
पुसों जाता सागों नये रामदास म्हणे पाहीं ।
तेथे कांहीं चिंता नाही।
 
आम्ही मोक्ष लक्ष्मीवंत ।
भवदरिद्र कैंचें तेथ श्रीपतीचे परिजन ।
आम्ही स्वानंदसंपन्न समाधान तें सभाग्य ।
असमाधान तें अभाग्य रामीरामदासीं देव ।
सख्यासहित स्वानुभव।
 
स्नान संध्या टिळेमाळा ।
पोटीं क्रोधाचा उमाळा एसें कैंसें रे सोंवळे।
शिवतां होतसे ओंवळें नित्य दंडितां हा देहो ।
परि फिटेना संदेहो बाह्य केली झळफळ ।
देहबुध्दीचा विटाळ नित्यनेम खटाटोप ।
मनीं विषयाचा जप रामदासीं द़ुढभाव ।
तेणेंविण सर्व वाव।
 
ब्रह्मादिक देव ब्रह्मज्ञानाआड ।
करिती पवाड विघ्नरुपें यालागीं सगुणभावें उपासना ।
करिजे निर्गुणा पावावया रामीरामदास विश्वासी सगुण ।
सगुणीं निर्गुण कळों आलें।
 
बाळक जाणेना मातेसी ।
तिचे मन तयापखशीं तैसा देव हा दयाळ ।
करी भक्तांचा सांभाळ धेनु वत्साचेनि लागें।
धांवें त्यांचे मागें मागें पक्षी वेंधतसे गगन ।
पिलांपाशी त्याचें मन मत्स्यआठवितां पाळी ।
कूर्म द्रुष्टीनें सांभाळी रामीरामदास म्हणे ।
मायाजाळाचीं लक्षणें।
 
गजेंद्र सावजे धरिला पानेडीं।
रामे तेथे उडी टाकली प्रल्हाद गांजिला तया कोण सोडी ।
रामे तेथे उडी टाकीयेली तेहेतीस कोटी देव पडिले बांदोडी ।
रामे तेथे उडी टाकियेली दासा पायी पडली देहबुध्दीबेडी।
रामे तेथे उडी टाकियेली रामदास म्हणे कां करिसी वणवण।
रामें भक्त कोण उपेक्षिले।
 
ध्यान करु जातां मन हरपलें।
सगुणी जाहलें गुणातीत जेथें पाहें तेथें राघवाचें ठाण।
करीं चाप बाण शोभतसे रामरुपीं दृष्टि जाऊनी बैसली।
सुखें सुखावली न्याहाळितां रामदास म्हणे लांचावलें मन।
जेथें तेथें ध्यान दिसतसे।
 
सोयरे जिवलग मुरडती जेथूनी।
राम तये स्थानीं जिवलग जीवातील जीव स्वजन राघव।
माझा अंतर्भाव सर्व जाणे अनन्यशरण जावें तया एका।
रामदास रंकाचिया स्वामी।
 
शिरीं आहे रामराज।
औषधाचे कोण काज जो जो प्रयत्न रामाविण।
तो तो दु:खासी कारण शंकराचे हळाहळ ।
जेणें केलें सुशीतळ आम्हा तोचि तो रक्षिता।
रामदासीं नाहीं चिंता।
 
ठकाराचें ठाण करीं चापबाण।
माझें ब्रह्मज्ञान ऐसें आहे. रामरुपीं देहो जाला नि:संदेहो ।
माझें मनीं राहो सर्वकाळ मुखीं रामनाम चित्ती घनश्याम।
होतसे विश्राम आठवितां रामदास म्हणे रामरुपावरीं ।
भावें मुक्ति चारी ओवाळीन।
 
कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत।
तेथें मी निवांत बैसेईन बैसेईन सुखरुप क्षणैक।
पाहिन विवेक राघवाचा स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ।
जेथें नाही मळ, माईकांचा माईकांचा मळ जाय तत्क्षणीं ।
रामदरुशणीं रामदास।
 
भगवंताचे भक्तीसाठी।
थोर करावी आटाटी स्वेदबिंदु आले जाण ।
तेंचि भागीरथीचे स्नान सकळ लोकांचे भाषण।
देवासाठीं संभाषण जें जें हरपलें सांडले ।
देवाविण कोठें गेलें जठराग्नीस अवदान।
लोक म्हणती भोजन एकवीस सहस्त्र जप।
होतो न करितां साक्षेप दास म्हणे मोठें चोज।
देव सहजीं सहज।
 
वेधें भेदावें अंतर ।
भक्ति घडे तदनंतर मनासारखें चालावें ।
हेत जाणोनि बोलावें जनी आवडीचे जन ।
त्यांचे होताती सज्जन दास म्हणे निवडावें ।
लोक जाणोनियां घ्यावे।

संत रामदासांचे अभंग 51 ते 100
रामभक्तीविण अणु नाही सार।
साराचेंहि सार रामनाम कल्पनाविस्तार होतसे संहारु ।
आम्हा कल्पतरु चाड नाहीं कामनेलागुनी विटलासे मनु ।
तेथें कामधेनु कोण काज चिंता नाहीं मनीं राम गातां गुणीं।
तेथें चिंतामणी कोण पुसे रामदास म्हणे रामभक्तीविणें।
जाणावें हें उणें सर्वकांही।
 
ऐसे आत्मज्ञान उध्दरी जगासी।
पाहेना तयासी काय करुं सर्व काळ गेला दारिद्रय भोगितां।
वैराग्य पाहतां तेथें नाहीं दारिद्रयाचें दु:ख केलें देशधडी।
रामराज्य गुढी उभविली उभविली गुढी भक्तिपंथें जावें।
शीघ्रचि पावावें समाधान समाधान रामीं रामदासां जालें।
सार्थकानें केलें सार्थकचि।
 
कौल जाला रघुनाथाचा ।
मेळा मिळाला संतांचा अहंभाव वरपेकरी ।
बळे घातला बाहेरी क्षेत्रीं मंत्री विवेक जाला।
क्रोध देशोधडी केला काम देहींच कोंडिला।
लोभ दंभ नागविला फितवेकर होता भेद ।
त्याचा केला शिरच्छेद तिरस्कार दावेदार ।
त्यास बोधे केला मार मन चोरटे धरिलें ।
नित्यनेमे जंजरिले आळस साक्षेपें घेतला।
पायीं धरुनि आपटिला द्वेष बांधोनि पाडिला।
खेद खाणोनि ताडिला गर्व ताठा विटंबिला।
वाद विवेके झोडिला करुनि अभावाचा नाश ।
राहे रामीं रामदास
 
असोनि ईंद्रियें सकळ।
काय करावीं निष्फळ नाहीं कथा निरुपण।
तेंचि बधिर श्रवण नाहीं देवाचें वर्णन ।
तें गे तेंचि मुकेपण नाहीं पाहिलें देवासी ।
अंध म्हणावें तयासी नाहीं उपकारा लाविले।
तें गे तेचि हात लुले केले नाही तीर्थाटण।
व्यर्थ गेले करचरण काया नाहीं झिजविली।
प्रेतरुपचि उरली दास म्हणे भक्तिविण ।
अवघे देह कुलक्षण।
 
वाणी शुध्द करीं नामें।
चित्त शुध्द करीं प्रेमें नित्य शुध्द होय नामीं ।
वसतांही कामीं धामीं कान शुध्द करी कीर्तन।
प्राण शुध्द करी सुमन कर शुध्द राम पूजितां।
पाद शुध्द देउळीं जातां त्वचा शुध्द करी रज।
मस्तक नमितां पादांबुज रामापायीं राहतां बुध्दि रामदासा सकळ शुध्दि।
 
काम क्रोध मद मत्सर।
जरी हे जाले अनावर यास करावें साधन ।
सदा श्रवण मनन बोलाऐसें चालवेना।
जीव भ्रांति हालवेना दृढ लौकिक सांडेना।
ज्ञानविवेक मांडेना पोटीं विकल्प सुटेना ।
नष्ट संदेह तुटेना दास म्हणे निर्बुजले ।
मन संसारीं बुडालें ।
 
रामनामकथा श्रवणीं पडतां ।
होय सार्थकता श्रवणाची मुखें नाम घेतां रुप आठवलें।
प्रेम दुणावलें पहावया राम माझे मनीं शोभे सिंहासनीं।
एकाएकीं ध्यानीं सांपडला रामदास म्हणे विश्रांति मागेन।
जीवींचें सांगेन राघवासी
 
निरुपणाऐसें नाहीं समाधान ।
आणिक साधन आढळेना भक्ति ज्ञान घडे वैराग्य आतुडे।
भावार्थ – सांपडे निरुपणें शांति क्षमा दया नैराश्यता मनीं।
अवस्था उन्मनी निरुपणें भ्रांतीचा संदेह तुटे एकसरा।
दास म्हणे करा निरुपण।
 
एकदां जेवितां नव्हे समाधान ।
प्रतिदिनीं अन्न खाणें लागें तैसें निरुपण केलेंचि करावें ।
परी न धरावें उदासीन प्रत्यहीं हा देहो पाहावा लागतो।
शुध्द करावा तो रात्रंदिस प्रत्यहीं देहानें भोगलें भोगावें।
त्यागिलें त्यागावें दास म्हणे।
 
कथानिरुपणें समाधि लागली।
वासना त्यागिली अंतरीची नाहींआपपर कीर्तनीं तत्पर ।
मनीं सारासार विचारणा अर्थारुढ मन श्रवण मनन ।
होय समाधान निजध्यास रामीरामदासीं कथेची आवडी ।
लागलीसे गोडी नीच नवी।
 
राघवाची कथा पतितपावन।
गाती भक्तजन आवडीनें राघवाच्या गुणा न दिसे तुळणा।
कैलासींचा राणा लांचावला देवांचें मंडण भक्तांचे भूषण।
धर्मसंरक्षण राम एक रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणें कथानिरुपणे जन्म गेला।
 
त्याचे पाय हो नमावें।
त्याचें किर्तन ऐकावें दुजियासी सांगे कथा।
आपण वर्ते त्याचि पंथा कीर्तनाचें न करी मोल।
जैसे अमृताचे बोल सन्मानिता नाहीं सुख।
अपमानितां नाहीं दु:ख ऐसा तोचि हरिदास ।
लटकें न वदे रामदास।
 
मुक्तपणे करी नामाचा अव्हेरू ।
तरी तो गव्हारु मुक्त नव्हे उच्चारितो शिव तेथें किती जीव ।
बापुडे मानव देहधारी रामनाम वाचें रुप अभ्यंतरीं ।
धन्य तो संसारीं दास म्हणे।
 
आत्मज्ञानी आहे भला।
आणि संशय उठिला त्यास नामचि कारण।
नामें शोकनिवारण नाना दोष केले जनीं।
अनुताप आला मनी रामी रामदास म्हणे।
जया स्वहित करणें।
 
रात्रंदिन मन राघवीं असावें ।
चिंतन नसावें कांचनाचें कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन ।
जन्मासी कारण हेंचि दोन्ही दोन्ही नको धरुं नको निंदा करुं।
तेणें हा संसारू तरशील तरशील भवसागरीं न बुडतां।
सत्य त्या अनंताचेनि नामें नामरुपातीत जाणावा अनंत।
दास म्हणे संतसंग धरा।
 
लोभा नवसांचा तो देव बध्दांचा।
आणि मुमुक्षांचा गुरू देव गुरु देव जाण तया मुमुक्षांचा।
देव साधकांचा निरंजन निरंजन देव साधकांचे मनीं ।
सिध्द समाधानी देवरुप देवरुप झाला संदेह तुटला।
तोचि एक भला भूमंडळीं भूमंडळीं रामदास्य धन्य आहे।
अन्यनता पाहें शोधूनियां।
 
राम कैसा आहे हें आधीं पाहावें।
मग सुखेनावें दास्य करुं दास्य करुं जन देव ओळखोन ।
जालें ब्रह्मज्ञान दास्य कैचें दास्य कैचें घडी देवासी नेणतां ।
वाउगें शिणतां श्रम उरे समाधान देव पाहतां घडेल ।
येर बिघडेल दास म्हणे
 
जो जो भजनासी लागला ।
तो तो रामदास जाला दासपण रामीं वाव ।
रामपणा कैंचा ठाव रामीं राम तोहि दास ।
भेद नाहीं त्या आम्हांस रामदास्य करुनि पाहे।
सर्व स्रुष्टी चालताहे प्राणिमात्र रामदास ।
रामदासीं हा विश्वास ।
 
दिनानाथाचे सेवक ।
आम्ही स्वामींहुनि अधिक शरणागत राघवाचे ।
परि शरण दारिद्रयाचे जें जें देवासी दु:सह ।
तें तें आम्हां सुखावह रामीरामदास म्हणे ।
रामकृपेचेनि गुणें।
 
राघवाचे दास सर्वस्वे उदास ।
तोडी आशापाश देवराणा देवराणा भाग्यें जालिया कैपक्षी ।
नाना परी रक्षी सेवकांसी सेवकासी कांहीं न लगे साधन ।
करीतो पावन ब्रीदासाठीं ब्रीदासाठीं भक्त तारिले अपार ।
आतां वारंवार किती सांगों किती सांगों देव पतितपावन ।
करावें भजन दास म्हणे।
 
कायावाचामनें यथार्थ रामीं मिळणें।
तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य कामक्रोध खंडणें मदमत्सर दंडणें।
तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य जैसे मुखें बोलणें तैसी क्रिया चालणें।
तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य रामदास म्हणे निर्गुण लाधणें।
तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य।
 
आमुचे वंशीं आत्माराम ।
एका पिंडींचे निष्काम रामदास्य आलें हातां।
अवघा वंश धन्य आतां बापें केली उपार्जना ।
आम्ही लाधलों त्या धना बंधु अभिलाषा टेकला ।
वांटा घेउनि भिन्न जाला रामीरामदासीं स्थिति ।
पाहिली वडिलांची रीति।
 
मनुष्याची आशा तेचि निराशा ।
एका जगदीशावांचुनिया वांचुनियां राम सर्वहि विराम ।
नव्हे पूर्ण काम रामेविण संकटींचा सखा निजांचा सांगाती ।
राम आदि अंतीं रामदासीं।
 
आम्हा ये प्रपंचीं कोणी नाहीं सखा।
एका रघुनायकावांचोनिया विद्या वैभव धन मज क्रुपणाचें।
जीवन जीवांचे आत्मारामु आकाश अवचितें जरि कोसळेल।
मज तेथें राखील आत्मारामु आपिंगिलें मज श्रीरामसमर्थे ।
ब्रह्मांड पालथें घालूं शके वक्रदृष्टि पाहतां भरिल त्याचा घोंट।
काळाचेंहि पोट फाडू शके रामदास म्हणे मी शरणागत त्याचा।
आधार सकळांचा मुक्त केला।
 
जठरीं लागो क्षुधा।
 होत नाना आपदा भक्तिप्रेम सदा ।
न सोडीं सत्य शब्द न फुटे जरी।
चिंतीन अंतरीं भक्तिप्रम परी ।
न सोडी सत्य आतांचि हा देहो ।
राहो अथवा जावो रामीं प्रेमभावो ।
न सोडी सत्य म्हणे रामदास ।
वरी पडो आकाश राघवाची कास ।
न सोडी सत्य।
 
रुप रामाचेंपाहतां।
मग कैंची रे भिन्नता दृश्य अदृश्यावेगळा ।
राम जीवींचा जिव्हाळा वेगळीक पाहतां कांहीं।
पाहतां मुळींच रे नाहीं रामदासीं राम होणें ।
तेथें कैचें रे देखणें
 
माझा स्वामी आहे संकल्पापरता।
शब्दीं कैसी आतां स्तुति करु स्तुति करुं जातां अंतरला दूरी ।
मीतूंपणा उरी उरों नेदी उरों नेदी उरी स्वमी सेवकपण ।
एकाकीं आपणाऐसें केलें केले संघटण कापुरे अग्नीसी।
तैसी भिन्नत्वासी उरी नाहीं उरी नाही कदा रामीरामदासा।
स्वये होय ऐसा तोचि धन्य।
 
कांहीं दिसे अकस्मात।
तेथें आलें वाटे भूत वायां पडावें संदेहीं।
मुळीं तेथें कांहीं नाहीं पुढे देखतां अंधार।
तेथें आला वाटें भार झाडझुडूप देखिलें ।
तेथें वाटे कोणी आलें रामदास सांगे खूण।
भितों आपणा आपण।
 
वाजे पाऊल आपुलें।
म्हणे मागें कोण आलें कोण धांवतसें आड।
पाहों जातां जालें झाड भावितसे अभ्यंतरीं।
कोण चाले बरोबरी शब्दपडसाद ऊठिला।
म्हणे कोण रे बोलिला रामीरामदास म्हणे।
ऐसीं शंकेचीं लक्षणे।
 
शक्ति आहे तों करावें विश्व कीर्तनें भरावें पुण्यवंत तो साक्षेपी।
आळशी लोकीं महापापी आपुलाचि घात करी ।
सदा कठोर वैखरी माणुस राजी राखों नेणें ।
त्यास न मानीती शहाणे गुणें माणूस भोंवतें।
अवगुणानें थितें जातें दास म्हणे भला भला।
जेथें तेथें पवाडला।
 
मनोगत जाणे सूत्र ।
जेथ तेथें जगमित्र न सांगतां काम करी।
ज्ञानें उदंड विवरी स्तुती कोणाची न करी।
प्राणिमात्र लोभ करी कदा विश्वास मोडीना ।
कोणी माणूस तोडीना जनीं बहुतचि साहतो।
कीर्तिरुपेचि राहतो दास म्हणे नव्हे दु:खी।
आपण सुखी लोक सुखी।
 
संतांची आकृति आणवेल युक्ती।
कामक्रोधा शांति नये नये भागवतींचा भाव आणवेल आव।
करणीचा स्वभाव नये नये रामदास म्हणे रामकृपेवांचोनी।
बोलाऐसी करणी नये नये।
 
कर्ता एक देव तेणें केलें सर्व।
तयापाशीं गर्व कामा नये देह हें देवाचें वित्त कुबेराचें ।
तेथें या जीवाचें काय आहे निमित्ताचा धणी केला असे प्राणी ।
पहातां निर्वाणीं जीव कैचा दास म्हणे मना सावध असावें ।
दुश्चित्त नसावें सर्वकाळ।
 
दृढ धरी मना जानकीजीवना।
तेणें समाधाना पावशील पावशील निज स्वरुप आपुलें।
जरी तें घडलें रामदास्य रामदास्य घडे बहुतां सुक्रुतें ।
कांहीं पुण्य होतें पूर्वजांचें ।
 
शरण जावें रामराया ।
पुढती न पाविजे हे काया जीव जीवांचा आहार ।
विश्व होतसे काहार एक शोकें आक्रंदती ।
तेणें दुजे सुखी होती दास म्हणे सर्व दु:ख ।
रामाविण कैसे सुख।
 
वासनेची बेडी देहबुध्दि वांकडी।
वाजे हुडहुडी ममतेची वैराग्याचा वन्ही विझोनिया गेला।
संचित खायाला पुण्य नाही भक्ति पांघरूण तें माझें सांडलें ।
मज ओसंडिलें संतजनीं रामदास म्हणे ऐसियाचें जिणें।
सदा दैन्यवाणें रामेविण।
 
परिचयें जेथें अत्यंत संबंध ।
तेथें उठे खेद विक्ल्पाचा म्हणोनियां मना निस्प्रुह असावें।
सर्वथा नसावें एके ठायीं सर्वकाळ गेला उद्वेगी पडतां ।
कोणे वेळे आतां समाधान अभ्यंतर पोळे राम विसंभतां।
दास म्हणे आतां समाधान।
 
देव पाषाण भाविला।
तोचि अंतरीं दाविला जैसा भाव असे जेथें ।
तैसा देव वसे तेथे दृश्य बांधोनिया गळां ।
देव जाहला निराळा दास म्हणे भावातीत।
होतां प्रगटे अनंत।
 
एक लाभ सीतापती।
दुजी संताची संगती लाभ नाहीं यावेगळा।
थोर भक्तीचा सोहळा हरिकथा निरुपण ।
सदा श्रवण मनन दानधर्म आहे सार।
दास म्हणे परोपकार
 
जो कां भगवंताचा दास ।
त्याने असावें उदास सदा श्रवण मनन।
आणि इंद्रियदमन नानापरी बोधुनि जीवा।
आपुला परमार्थ करावा आशा कोणाची न करावी।
बुध्दि भगवंतीं लावावी रामदासीं पूर्णकाम।
बुध्दि दिली हे श्रीरामे।
 
पतित हे जन करावे पावन।
तेथे अनुमान करूं नये करुं नये गुणदोष उठाठेवी।
विवेकें लावावी बुध्दि जना बुध्दि लावी जना त्या नाव सज्ञान ।
पतितपावन दास म्हणे।
 
पोट भरावया मांडिले उपास।
जाला कासाविस लाभेंविण ब्रम्ह साधावया कर्ममार्गे गेला।
तंव कर्मे केला कासाविस सुटका व्हावया बंधनचि केलें।
तेणें तें सुटलें केंवि घडे एक व्यथा एक औषध घेतलें।
दास म्हणे जालें तयापरी।
 
अर्थेविण पाठ कासया करावें।
व्यर्थ का मरावें घोकुनीयां घोकुनिया काय वेगीं अर्थ पाहे।
अर्थरुप राहे होउनियां होउनिया अर्थ सार्थक करावें।
रामदास भावें सांगतसे।
 
ज्ञानाचें लक्षण क्रियासंरक्षण।
वरी विशेषेण रामनाम अंतरीचा त्याग विवेके करावा।
बाहेर धरावा अनुताप ब्रह्मादिका लाभ ज्ञानाचा दुर्लभ।
तो होय सुलभ साधुसंगें साधुसंगें साधु होइजे आपण।
सांगतसे खुण रामदास।
 
माजी बांधावा भोपळा ।
तैसी बांधो नये शिळा घेऊ येते तेचि घ्यावें।
येर अवघेचि सांडावें विषवल्ली अमरवल्ली।
अवघी देवेचि निर्मिली दास म्हणें हरिजन ।
धन्य जाण ते सज्जन।
 
भाग्यवंत नर यत्नासी तत्पर।
अखंड विचार चाळणांचा चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा।
अखंड शाहाणा तोचि एक प्रव्रुत्ति निव्रुत्ति चाळणा पहिजे।
दास म्हणे कीजे विचारणा।
 
नमू रामक्रुष्णा आदिनारायणा।
तुम्ही त्या निर्गुणा दाखवावें दाखवावे निजस्वरुप आपुँलें।
दिसेनासे जालें काय करू पांडुरंगा देवा अगा महादेवा।
तुम्ही मज द्यावा ठाव ब्रह्मीं ब्रह्मी ब्रह्मरुप ते मज करावें ।
रामदास भावें प्रार्थितसे ।
 
सूर्यनारायणा देवा नमस्कार।
तुवां निराकार दाखवावें दाखवुनी द्यावें मज निववावें ।
चंद्रा तुज भावें प्राथितसें प्राथितसें मही आणि अंतरिक्षा।
तुम्ही त्या अलक्षा दाखवावें दाख़वावें मज आपोनारायणें।
ब्रह्मप्राप्ति जेणें तें करावें करावे सनाथ अग्निप्रभंजने।
नक्षत्रे वरुणें दास म्हणे।
 
तुम्ही सर्व देव मिळोनी पावावें।
मज वेगीं न्यावें परब्रहमीं परब्रह्मीं न्यावें संतमहानुभावें।
मज या वैभवें चाड नाहीं चाड नाही एका निर्गुणावांचोनी।
माझे ध्यानीं मनीं निरंजन निरंजन माझा मज भेटवावा।
तेणें होय जीवा समाधान समाधान माझें करा गा सर्वहो।
तुम्हांसी देव हो विसरेना विसरेना देह चालतो तोंवरी।
बाह्य अभ्यंतरी दास म्हणे।
 
मन हे विवेके विशाळ करावें।
मग आठवावे परब्रह्म परब्रह्म मनीं तरीच निवळे।
जरी बोधें गळे अहंकार अहंकार गळे संतांचे संगतीं।
मग आदि अंतीं समाधान समाधान घडे स्वरुपीं।
राहतां विवेक पाहतां नि:संगाचा नि:संगाचा संग।
सदृढ धरावा।संसार तरावा दास म्हणे।

संत रामदासांचे अभंग 101 ते 150
कल्पनेच्या देवा कल्पनेची पूजा।
तेथें कोणी दुजा आढळेना आढळेना देव आढळेना भक्त।
कल्पनेरहित काय आहे आहे तैसे आहे कल्पना न साहे।
दास म्हणे पाहे अनुभवें
 
विदेशासी जातां देशचि लागला।
पुढें सांपडला मायबाप सर्व देशीं आहे विचारें पाहतां।
जाता न राहता सारिखाची व्यापुनियां दासा सन्निधचि असे।
विचारें विलसे रामदासीं
 
मनाहूनि विलक्षण ।
तेंचि समाधिलक्षण नलगे पुरुनी घ्यावें।
नलगे जीवेंचि मरावे अवघा वायु आटोपावा।
नलगे ब्रम्हांडासी न्यावा डोळे झाकूनि बैसला।
परि तो मनें आटोपिला नाना साधनीं सायास।
मनें केला कासाविस रामदास म्हणे वर्म।
हेंचि मनाचें सुगम
 
दृढ होतां अनुसंधान।
मन जाहलें उन्मन होता बोधाचा प्रबोध ।
जाला शब्दांचा नि:शब्द ज्ञान विज्ञान जाहलें ।
वृत्ति निवृत्ति पाहिलें ध्यानधारणेची बुध्दि ।
जाली सहज समाधि रामीरामदासीं वाच्य ।
पुढें जालें अनिर्वाच्य
 
ज्ञानेविण जे जे कळा ।
ते ते जाणावी अवकळा ऐसें भगवंत बोलिला ।
चित्त द्यावें त्याच्या बोला एक ज्ञानचि सार्थक ।
सर्व कर्म निरर्थक दास म्हणे ज्ञानेविण ।
प्राणी जन्मला पाषाण
 
कोणें प्रारब्ध निर्मिलें।
कोणें संसारीं घातलें ब्रह्मादिकांचा निर्मिता ।
कोण आहे त्या परता अनंत ब्रह्मांडांच्या माळा ।
विचित्र भगवंताची कळा रामदासांचा विवेक ।
सर्वा घटीं देव एक
 
पतित म्हणजे वेगळा पडिला ।
पावन तो जाला एकरुप एकरुप देव अरुप ठायींचा ।
तेथे दुजा कैंचा कोण आहे कोण आहे दुजा स्वरुपीं पाहतां ।
विचारें राहतां सुख आहे सुख आहें मूळ आपुलें शोधितां ।
मनासी बोधितां रामदास
 
कर्ता तूं नव्हेसी करवितानव्हेसी।
जाण निशचयेसी आलया रे चंद्रसूर्यकळा धरा मेघमाळा।
जीववीति कळा देवापासीं देवें केलें अन्न केलें तें जीवन।
तेणें पंचप्राण स्थिर जाले दास म्हणे मना तुज देवें केलें।
मग त्वां देखिलें सर्वकाहीं
 
करुनी अकर्ते होऊनियां गेले ।
तेणे पंथें चाले तोचि धन्य तोचि धन्य जनीं पूर्ण समाधानी।
जनीं आणि वनीं सारिखाचि कळतसे परी अंतर शोधावें ।
मनासि बोधावें दास म्हणें
 
गगना लावू जातां पंक।
लिंपे आपुला हस्तक ऊर्ध्व थुंकता अंबरीं ।
फिरोनि पडे तोंडावरीं ह्रदयस्थासी देतां शिवी।
ते परतोनी झोंबे जिवीं प्रतिबिंबासी जें जे करी।
तेंआधींच तोंडावरी रामीरामदासी बुद्धि ।
जैसी होय तैसी सिद्धि
 
राघवाचे घरीं सदा निरुपण ।
श्रवण मनन निजध्यास विचारणा सारासार थोर आहे।
अनुभवे पाहें साधका रे साधका रे साध्य तूंचि तूं आहेसी।
रामीरामदासीं समाधान
 
स्वस्कंधी बैसणें आपुलिये छाये।
अघटित काय घडो शके दुजेविण सुखें स्वरुप बोलणे ।
अद्वैतासी उणे येऊं पाहे सुख आणि दु:ख वृत्तीच्या संबंधें।
निवृत्तीच्या बोधें द्वंद्व कैचे सुखातीत देव पहावा अनंत।
दास म्हणे संत वृत्तिशून्य वृत्तिशून्य संत असोनिया वृत्ति।
हेखूण जाणती अनुभवी
 
बोलवेना तें बोलावे।
चालवेना तेथें जावें नवल स्वरुपाचा योग ।
जीवपणाचा वियोग हातां नये तेचि घ्यावें ।
मनेंवीण आटोपावें रामदासीं दृढ बुध्दि ।
होतां सहज समाधि
 
माझे मी तूं पण विवेकाने नेलें।
देवाजीने केलें समाधान आपुल्या सुखाचा मज दिला वाटा।
वैकुंठीचा वाटा कोण धांवे देवासी नेणतां गेले बहु काळ ।
सार्थकाची वेळ एकाएकी एकाएकीं एक देव सांषडला।
थोर लाभ झाला काय सांगों
 
योगियांचा देव मज सांपडला।
थोर लाभ जाला एकाएकीं एकाएकीं एक त्रैलोक्यनायक ।
देखिला सन्मूख चहुंकडे चहुंकडे देव नित्यनिरंतर ।
व्यापुनी अंतर समागमें समागम मज रामाचा जोडला ।
वियोग हा केला देशधडी देशधडी केला विवेके वियोग ।
रामदासीं योग सर्वकाळ
 
राघवाचा धर्म गाजो।
कीर्ति अद्भुत माजो ठाईं ठाईं देवालयें ।
भक्तमंडळी साजो शक्ति आहे तोचि फावे ।
दोनी लोक साधावे इहलोक परलोक ।
शत्रु सर्व रोधावे संसारिचें दु:ख मोठें ।
हें मी कोणाला सांगों जन्म गेला तुजविण ।
आणिक काय मी मागों मागता समर्थाचा ।
तेणें कोणा सांगावें रामेविण कोण दाता ।
कोणामागे लागावें रामदास म्हणे देवा ।
आतां पुरे संसार असंख्य देणे तुझें ।
काय देतील नर
 
वदन सुहास्य रसाळ हा राघव ।
सर्वांगी तनु सुनीळ हा राघव मृगनाभी रेखिला टिळा हा राघव।
मस्तकीं सुमनमाळा हा राघव साजिरी वैजयंती हा राघव ।
पायीं तोडर गर्जती हा राघव सुंदर लावण्यखाणी हा राघव ।
उभा कोदंडपाणी हा राघव सकल जीवांचें जीवन हा राघव।
रामदासासि प्रसन्नहा राघव ।
 
कुळ हनुमंताचें ।
मोठे किराण त्यांचें भुभुकारें ँळळजयाचें ।
किलकिलाटें आतां वाटतें जावें।
त्याचें सांगाती व्हावें डोळे भरुनी पहावें ।
सर्वांग त्यांचें ऐकोनी हासाल परी ।
नये तयांची सरी विचार जयांसी करी ।
स्वामी माझा असंख्य मिळाला मेळा ।
रामा भोंवता पाळा पालथें या भूगोळा ।
घालू शकती ऐसी करणी त्यांची ।
व्यर्थ जिणीं आमुचीं पाला खाउनी रामाची ।
शुश्रुषा केली ऐसे ते रामदास ।
सर्वस्वे उदास रामीं जयांचा विश्वास ।
बाणोनि गेला
 
देव वैकुंठीचा ।
कैपक्षी देवाचा भार फेडिला भूमीचा ।
आत्मा सर्वांचा पाळक प्रजाचा ।
योगी योगियांचा राजा सूर्यवंशींचा ।
तो अयोध्येचा राम सामर्थ्याचा ।
कैवारी देवांचा मेघ वोळला सुखाचा ।
न्यायनीतीचा उध्दार अहिल्येचा ।
एकपत्नीव्रताचा सत्य बोलणे वाचा ।
जप शिवाचा नाथ अनाथांचा ।
स्वामी हनुमंताचा सोडविता अंतीचा ।
रामदासाचा
 
 कैवारी हनुमान,आमुचा ।।
पाठी असतां तो जगजेठी ।
वरकड काय गुमान नित्य निरंतर रक्षी नानापरी ।
धरुनियां अभिमान द्रोणागिरि करि घेउनि आला ।
लक्ष्मणप्राणनिधान दासानुदासा हा भरंवसा ।
वहातसे त्याची आण
 
घात करा घात करा ।
घात करा ममतेचा ममतागुणें खवळें दुणें ।
राग सुणें आवरेना ममता मनीं लागतां झणीं ।
संतजनीं दुरावली दास म्हणे बुध्दि हरी ।
ममता करी देशधडी
 
सखियेहो आहेति उदंड वेडे ।
ऐसे ते सज्जन थोडे तयाची संगति जोडे ।
परम भाग्यें सकळांचे अंतर जाणे ।
मीपणें हुंबरों नेणें ऐसियावरून ।
प्राणसांडण करुं साहती बोलणें उणें ।
न पुसतां सांगणें समचि देखणें उणें ।
अधिक नाहीं अभिमान नावडे ।
धांवती दीनांकडे तयांचे जे उकरडे ।
महाल त्यांचे आपपर नाही ज्यासी ।
पुसतां सांगती त्यासी ऐकतांचि भाविकांसी ।
पालट होये रामीरामदास। वास ।
पाहतो रात्रंदिस ऐसियाचा सौरस ।
देईं राघवा
 
शहाणें शोधितां नसे । दुष्काळ पडिला असे तया धुंडितसे मन माझें रे आहेति थोर थोर। परि नाहीं चतुर ।
तेथें निरंतर मन माझें रे
भेदिक शाहाणे जनी ।
सगुण समाधानी धन्य धन्य ते जनीं कुळखाणी रे रामीरामदासीं मन ।
जाहलें उदासीन ऐसे ते सज्जन पहावया रे
 
साधुसंतां मागणें हेंची आतां ।
प्रीति लागो गोविंदगुण गातां वृत्ति शून्य जालीया संसारा ।
संतांपदीं घेतला आम्हीं थारा आशा तृष्णा राहिल्या नाहीं कांहीं ।
देहप्रारब्ध भोगितां भय नाहीं गाऊं ध्याऊं आठवूं कृष्ण हरी ।
दास म्हणे सप्रेम निरंतरीं
 
पावनभिक्षा दे रे राम ।
दीनदयाळा दे रे राम अभेदभक्ति दे रे राम ।
आत्मनिवेदन दे रे राम तद्रूपता मज दे रे राम ।
अर्थारोहण दे रे राम सज्जनसंगति दे रे राम ।
अलिप्तपण मज दे रे राम ब्रह्मानुभव दे रे राम ।
अनन्य सेवा दे रे राम मजविण तूं मज दे रे राम ।
दास म्हणे मज दे रे राम
 
कोमळ वाचा देरे राम ।
विमळ करणी दे रे राम हितकारक दे रे राम ।
जनसुखकारक दे रे राम अंतरपारखी दे रे राम ।
बहु जनमैत्री दे रे राम विद्या – वैभव दे रे राम ।
उदासिनता दे रे राम मागो नेणें दे रे राम ।
मज न कळे तें दे रे राम तुझी आवडी दे रे राम ।
दास म्ह्णे मज दे रे राम
 
संगित गायन दे रे राम ।
आलाप गोडी दे रे राम धात माता दे रे राम ।
अनेक धाटी दे रे राम रसाळ मुद्रा दे रे राम ।
जाड कथा दे रे राम प्रबंध सरळी दे रे राम ।
शब्द मनोहर दे रे राम सावधपण मज दे रे राम ।
बहुत पाठांतर दे रे राम दास म्हणे रे गुणधामा ।
उत्तम गुण मज दे रे राम
 
अपराध माझा क्षमा करीं रे श्रीरामा दुर्लभ देह दिधले ।
असतां नाहीं तुझिया प्रेमा व्यर्थ आयुष्य वेंचुनि विषयीं।
जन्मुनि मेलों रिकामा नयनासारिखें दिव्य निधान पावुनियां।
श्री रामा विश्वप्रकाशक तुझे रुपडें न पाहें मेघश्यामा श्रवणें।
सावध असतां तव गुणकीर्तनि त्रास आरामा षड्रसभोजनि जिव्हे।
लंपट नेघे तुझिया नामा घ्राण सुगंध हरुषें नेघे निर्माल्य।।
विश्रामा करभूषणें तोषुनि नार्चिति तव स्वरुपा गुणधामा मस्तक।
श्रेष्ठ हें असतां तनुतें न वंदीं पदपद्मा दास म्हणे तूं करुणार्णव।
हे सीतालंकृतवामा।
 
शरण तुज रघुवीरा ।
हो रामा ,गुणगंभीरा धन्य धन्य दातारा ।
कृपाळू खरा जन्मदु:ख सांगता नये ।
सांगू मी काय दूरी करुनि अपाय ।
केले उपाय बाळपणापासुनि वेडें ।
तुज सांकडें सांगू मी कवणापुढें ।
जालें एवढें जीवींचें मनींचें पुरविलें ।
गोमटें केलें सर्व साहोनियां नेलें ।
नाहीं पाहिलें देवा तूं त्रैलोक्यनाथ ।
मी रे अनाथ मज करुनि सनाथ ।
केले समर्थ दास म्हणे तुझ्या अन्नाचा ।
वाढलों साचा मज हा संसार कैचा ।
सर्व देवाचा
 
हे दयाळुवा हे दयाळुवा ।
हे दयाळुवा स्वामि राघवा प्रथम का मला लाविली सवे ।
मग उपेक्षणें योग्य हें नव्हे सकळ जाणतां अंतर स्थिति ।
तरी तुम्हांप्रति काय विनंति दास तुमचा वाट पाहतो बोलतां नये कंठ दाटतो
 
दीनबंधु रे दीनबंधु रे ।
दीनबंधु रे राम दयासिंधु रे भिल्लटीफळें भक्तवत्सलें ।
सर्व सेवलीं दासप्रमळें चरणीं उध्दरी दिव्य सुंदरी ।
शापबंधनें मुक्त जो करी वेदगर्भ जो शिव चिंतितो ।
वानरां रिसां गूज सांगतो राघवीं बिजें रावणानुजे ।
करुनि पावला निजराज्य जें पंकजाननें दैत्यभंजने ।
दास पाळिलें विश्वमोहनें
 
धांव रे रामराया।
किती अंत पाहसी प्राणांत मांडला कीं, ।
नये करुणा कैसी पाहीन धणीवरी ।
चरण झाडीन केशीं नयन शिणले बा ।
आतां केधवां येसी मीपण अहंकारें ।
अंगी भरला ताठा विषयकर्दमांत ।
लाज नाही लोळता चिळस उपजेना ।
ऐसे जालें बा आतां मारुतिस्कंधभागीं ।
शीघ्र बैसोनी यावें राघवें वैद्यराजे ।
कृपाऔषध द्यावें दयेच्या पद्महस्ता ।
माझे शिरीं ठेवावें या भवीं रामदास ।
थोर पावतो व्यथा कौतुक पाहतोसी ।
काय जानकीकांता दयाळा दीनबंधो ।
भक्तवत्सला आतां
 
कंठत नाहीं सुटत नाहीं ।
पराधीनता भारी शोक सरेना धीर धरेना ।
अहंममता दु:खकारी दास म्हणे तो लोभें शिणतो ।
राघव हा अपहारी
 
कल्याण करीं देवराया ।
जनहित विवरीं तळमळ तळमळ होत चि आहे ।
हे जन हातीं धरीं अपराधी जन चुकतचि गेले ।
तुझा तूंचि सांवरीं कठीण त्यावरि कठीण जालें ।
आतां न दिसे उरी कोठें जावें काय करावें ।
आरंभली बोहरी दास म्हणे आम्हीं केलें पावलों ।
दयेसि नाहीं सरी
 
रामा हो जय रामा हो ।
पतितपावन पूर्णकामा हो नाथा हो दिनानाथा हो ।
तुमचे चरणीं राहो माथा हो बंधु हो दीन बंधु हो ।
रामदास म्हणे दयासिंधु हो
 
जिवींची जीवनकळा सहसा न धरी माइक माळा।
वो नादबिंदु कळा त्याहीवरती जिची लीळा वो।
तारी दीन जनांला शम विषम दु:खानळा वो हरी।
निर्भ्रममंडळा दावी निजात्मसुखसोहळा वो योग्यांची।
माउली ऐक्यपणेंविण वेगळी वो सर्वरुपी संचली।
पाहतां देहबुध्दि वेगळी वो नवचे हे वर्णिली परादि।
वाचा पारुषली वो अभिन्नभावें भली।
दासें नयनेविण देखिली वो।
 
रे मानवा उगीच आमुची जिणी ।
आम्हा ध्यानीं भेटीची शिराणी नरापरिस वानर भले ।
जिहीं डोळां राम देखियेले ज्यासी रघुराज। हितगुज बोले ।
कोण्या भाग्यें भगवंत भेटले रामीं मिनले ते असो नीच याती ।
त्यांच्या चरणाची वंदीन माती नित्य नव्हाळी गाउनि करुं किती ।
तेणे रघुनाथीं उपजेल प्रीती रामीरामदास म्हणे ऐका करु ।
यारे आम्ही तैसाचि भाव धरुं भक्तिप्रेमाचा दाऊं निर्धारु ।
तेणें आम्हां भेटेल रघुवीरु
 
पूर्ण ब्रह्म होय गे ।
वर्णूं मी आतां काय गे नंद ज्याचा बाप त्याची ।
यशोदा ती माय रे क्षीरसागरवासी गे ।
लक्ष्मी त्याची दासी गे अर्जुनाचे घोडे धुतां ।
लाज नाही त्यासी ग अनाथाचा नाथ गे ।
त्याला कैसी जात गे चोख्यामेळ्यासंगें जेवी ।
दहीदूध भात गे नंदाचा जो नंद गे ।
सर्व सुखाचा कंद गे रामदास प्रेमें गाय ।
नित्य त्याचा छंदगे
 
वय थोडें ठाकेना तीर्थाटन ।
बुध्दि थोडी घडेना पारायण एका भावें भजावा नारायण ।
पुढें सहजचि सार्थकाचा क्षण दास म्हणे भजनपंथ सोपा ।
हळूहळू पावसी पद बापा कष्ट करुनी कायसा देसि धांपा ।
रामकृपेनें अनुभव सोपा
 
रामाची करणी ।
अशी ही पहा दशगुणें आवरणोदकीं ।
तारियली धरणी सुरवर पन्नग निर्मुनियां जग ।
नांदवी लोक तिन्ही रात्रीं सुधाकर तारा उगवती ।
दिवसां तो तरणी सत्तामात्रें वर्षति जलधर ।
पीक पिके धरणी रामदास म्हणे आपण निर्गुण ।
नांदे ह्रदयभुवनीं
 
कृपा पाहिजे ।
राघव कृपा पाहिजे मन उदासिन इंद्रियदमन ।
तरिच लाहिजे निंदक जनीं समाधानी ।
तरिच राहिजे दास निरंतर नीच उत्तर ।
तरिच साहिजे
 
नामचि कारण रे ।
महाभय नामें निवारण रे नामें होय चित्त शुध्दि ।
नामें होय दृढ बुध्दि नामें महा दोष जाती ।
पुढें संताची संगति रामदास सांगे खूण ।
नाम सिध्दांचें साधन
 
श्रीगुरुंचे चरणकंज हृदयीं स्मरावें निगमनिखिल साधारण ।
सुलभाहुनि सुलभ बहू इतर योग याग विषमपथीं कां शिरावें नरतनु दृढ नावेसी ।
बुडवुनी अति मूढपणें दुष्ट नष्ट सुकर – कुकर तनू कां फिरावें रामदास विनवि तुज ।
अझुनि तरी समज उमज विषयवीष सेवुनियां फुकट कां मरावें
 
त्रिविध तापहारक हे गुरुपाय ।
भवसिंधूसि तारक हे गुरुपाय स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय ।
ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय ।
नयनिं श्रीराम दाविती हे गुरुपाय सहज शांतीचें आगर हे गुरुपाय ।
सकल जीवासी पावन हे गुरुपाय
 
आतां तरी जाय जाय जाय ।
धरिं सद्गुरुचे पाय संकल्प विकल्प सोडूनि राहें ।
दृढ धरुनियां पाय पाय पाय नामस्मरण ज्या मुखीं नाहीं ।
त्याणें वांचुनी काय काय काय मानवतनु ही नये मागुती ।
बरें विचारुनि पाहें पाहें पाहें आत्मानात्म विचार न करितां व्यर्थ प्रसवली माय माय माय सहस्र अन्याय जरी त्वा केले ।
कृपा करिल गुरुमाय माय माय रामदास म्हणे नामस्मरणें ।
भिक्षा मागुनि खाय खाय खाय
 
करीं सीताराम मैत्र ।
होईल देह तुझा पवित्र वरकड भिंतीवरील चित्र ।
का भुललासी कांरे बैसलास निश्चळ ।
करशिल अनर्थास मूळ सांडुनी विश्रांतीचे स्थळ कां भुललासी मुख्य असू द्यावी दया ।
नाहीतर सर्व हि जाईल वायां मिठी घाली रामराया ।
कां भुललासी करशिल डोळ्याचा अंधार ।
पाहें जनासी निर्वैर सांडीं धन संपत्तीचे वारें ।
कां भुललासी रामदासाचें जीवन ।
तू कां न करिसी साधन राम तोडिल भवबंधन ।कां भुललासी
 
सुखदायक गायक नेमक ।
साधक तो असावा हरिभक्त ।
विरक्त संयुक्त विवेकी तो भजावा ।
 
प्रपंच दु:खाचा द्रुम ।
वाढला चुंबित व्योम तेथें पाहती संभ्रम ।
सुखाची फळें सदा फळ आभासे ।
पाड लागला दिसे परि तो निष्फळ भासे ।
पाहतां देठी तयावरी दोनी पक्षी ।
एक उदास उपेक्षी येर तो सर्वत्र भक्षी ।
परि न धाये सेवितां तयाची छाया ।
तापली परम काया तरी ही बैसती निवाया ।
आत्मरुप प्राणी रामी रामदासी लक्ष ।
तोचि जाला कल्पवृक्ष सेवी सज्जन दक्ष ।
स्वलाभे पूर्ण
 
ज्ञान पवाड पवाड गगनाहुनी वाड ।
मुक्ति जाड रे जाड रे अत्यंतचि जाड भक्ति गोड रे गोड रे मुक्तिहुनी गोड।
पुरे कोड रे कोड रे नाही अवघड दास म्हणे रे म्हणे रे दास्यत्व करावें।
भक्तियोगे रे योगे रे जन उध्दरावे दया देवाची देवाची सर्वत्रीं पुरावें वृत्ति संमंधें संमंधें कांहींच नुरावें
 
नाना पिकाची भोय ।
वाहिल्याविण जाय शोधल्याविण उपाय ।
व्यर्थचि होय नाना औषधें घेतो ।
पथ्य न करितो तैसा वचनें करितो ।
परि वर्तेना तो रामदास म्हणे ।
भीकचि मागणें आणि वैभव सांगणें ।
तैसें बोलणें

संत रामदासांचे अभंग 151 ते 200
जना जन पाळिताहे वृध्दा बाळपण बाळा वृध्दपण ।
अंतर शोधुनि पाहें श्रेष्ठ कनिष्ठा कनिष्ठ श्रेष्ठां ।
उसिणें फिटत जाय जग जगाचें जीवन साचें ।
कर्ता तो करिताहे एका पाळितो पाळुनि घेतो ।
दोंहिकडे फिरताहे अंतरवासी देव विलासी ।
दास समजत राहे
 
काय पाहों मी आतां ।
रुप न दिसे पाहतां खूण न ये सांगतां रे रामा दृश्य पाहतां डोळा ।
वाटतो सोहळा त्याहूनि तू निराळा रे रामा ज्ञान हातासी आलें ।
त्याचें विज्ञान जाले तेंहि नाहीं राहिलें रे रामा दासें घेतली आळी ।
पावावें ये काळीं सगुणरुपें सांभाळीं रे रामा
 
चालत नाहीं बोलत नाहीं ।
हालत नाहीं तो निरंजन दिसत नाहीं भासत नाहीं ।
नासत नाहीं तो निरंजन करीत नाहीं धरीत नाहीं ।
हरीत नाहीं तो निरंजन नामचि नाहीं रुपचि नाहीं ।
चंचळ नाहीं तो निरंजन निर्मळ जो तो निश्चळ जो तो ।
दासचि होतो तो निरंजन
 
देखिला रे देव देखिला रे ।
ज्ञानें भक्तिचा रस चाखिला रे विश्वामध्यें विस्तारला ।
भावें भक्तांसी पावला भक्तिलागीं लांचावला ।
भक्ता पद देतसे जगामध्यें आहे ईश ।
म्हणोनि बोलिजे जगदीश जयाचेनि सुंदर वेश ।
नाना रुपें शोभती जनीं श्रोता वक्ता होतो ।
तोचि देखतो चाखतो वृत्ती सकळांच्या राखतो।
मनीं मन घालुनी ज्ञानी ज्ञाने विवरला ।
एक त्रैलोक्यीं पुरला धन्य धन्य तो एकला ।
नाना देह चाळवी सर्व करितो दिसेना ।
एके ठायी हि वसेना जवळीच निरसेना ।
दास म्हणे तो गे तो
 
सर्वा अंतरीं आत्माराम ।
विश्रामधाम मध्यें आडवा आला भ्रम ।
देहसंभ्रम यम नियम दम ।
नित्य प्राणायाम आगमनिगम ।
संतसमागम ठायी पडेना वर्म ।
उभे राहिलें कर्म सदा नित्य नेम ।
वाची सहस्रनाम दास म्हणे राम ।
आहे पूर्ण काम
 
संसारीं संतोष वाटला ।
देव भेटला, मोठा आनंदु जाला सुखसागर उचंबळे ।
जळ तुंबळे, दु:खसिंधु निमाला सेवकासी ज्ञान दीधलें ।
काम साधलें देवदर्शन जालें आत्मशास्त्रगुरुप्रत्ययें ।
शुध्द निश्चयें ऐसें प्रत्यया आलें देवचि सकळ चालवी ।
देह हालवी, अखंडिताची भेटी उत्तम सांचला संयोग ।
नाहीं वियोग, अवघ्या जन्माशेवटीं दास म्हणे दास्य फळलें ।
सर्व कळले,ज्ञानें सार्थक जालें सार्थकचि जन्म जाला ।
मानवी भला ,परलोकासी नेला
 
होते वैकंठीचे कोनीं
। शिरले अयोध्याभुवनी लागे कौसल्येचे स्तनीं ।
तेंचि भूत गे माय जातां कौशिकराउळीं ।
अवलोकिली भयंकाळीं ताटिका ते छळूनि मेली ।
तेंचि भूत गे माय मार्गी जातां वनांतरीं ।
पाय पडला दगडावरी पाषाणाची जाली नारी ।
तेंचि भूत गे माय जनकाचे रंगणीं गेलें ।
शिवाचें धनु भंगिलें वैदेही अंगीं संचरलें ।
तेंचि भूत गे माय जेणें सहस्त्रार्जुन वधिला ।
तोहि तात्काळचि भ्याला धनु देऊनि देह रक्षिला ।
तेंचि भूत गे माय पितयाचे भाकेसी ।
कैकयीचें वचनासी चौदा संवत्सर तापसी ।
अखंडवनवासी सांगातीं भुजंग पोसी ।
तेंचि भूत गे माय सुग्रीवाचें पालन ।
वालीचें निर्दालन तारी पाण्यावरी पाषाण ।
तेंचि भूत गे माय रक्षी भक्त बिभीषण ।
मारी रावण कुंभकर्ण तोडी अमरांचें बंधन ।
तेंचिभूत गे माय वामांगीं स्त्रियेसी धरिलें।
धावूनि शरयूतीरा आलें तेथें भरतासी भेटलें ।
तेंचि भूत गे माय सर्व भूतांचें हृदय ।
नांव त्याचें रामराय रामदास नित्य गाय ।
तेंचि भूत गे माय
 
आम्ही काय कुणाचें खातो तो राम आम्हांला देतो बांधिले घुमट किल्ल्याचे तट ।
तयाला फुटती पिंपळवट नाहीं विहीर आणि मोट ।
बुडाला पाणी कोण पाजीतो खडक फोडितां सजिव रोडकी ।
पाहिली सर्वांनीं बेडकी सिंधु नसतां तियेचें मुखीं ।
पाणी कोण पाजीतो नसतां पाण्याचे बुडबुडे ।
सदासर्वदा गगन कोरडें दास म्हणे जीवन चहुकडे ।
घालुनी सडे पीक उगवीती
 
आम्हा तुम्हा मुळीं जाली नाही तुटी।
तुटीविण भेटी इच्छितसां सर्वकाळ।
तुम्ही आम्ही एके स्थळीं वाया म़गजळीं।
बुडों नये जवळीच आहे नका धरुं दुरी बाह्य।
अभ्यंतरीं असोनियां लावू नये भेद मायिकसंबंधीं।
रामदासीं बोधीं भेटी जाली।
 
माझी काया गेली खरें ।
मी तों आहे सर्वांतरें ऐका स्वहित उत्तरें ।
सांग़इन राहा देहाच्या विसरें ।
वर्तो नका वाईट बरें तेणें भक्तिमुक्तिची द्वारें ।
चोजवती बुध्दि करावी स्वाधीन ।
मग हें मजूर आहे मन हेंचि करावें साधन ।
दास म्हणे
 
सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझें कारणीं देह माझा ।
पडावा उपेक्षू नको गूणवंता अनंता रघूनायका मागणें हें चि आतां ।
 
दृढ होतां अनुसंधान ।
मन जाहलें उन्मन पाहों जातां माया नासे ।
द्वैत गेलें अनायासें होतां बोधाचा प्रबोध ।
जाला शब्दाचा नि:शब्द ज्ञान विज्ञान जाहलें ।
वृत्ति निवृत्ति पाहिलें ध्यानधारणेची बुध्दि ।
जाली सहजसमाधि रामरामदासी वाच्य ।
पुढें जालें अनिर्वाच्य।
 
ज्ञानेविण जे जे कळा ।
ते तें जाणावी अवकळा ऐसें भगवंत बोलिला ।
चित्त द्यावें त्याच्या बोला एक ज्ञानची सार्थक ।
सर्व कर्म निरर्थक दास म्हणे ज्ञानेविण ।
प्राणी जन्मला पाषाण
 
पतित म्हणिजे वेगळा पडिला ।
पावन तो जाला एकरुप एकरूप देव अरूप ठायींचा ।
तेथें दुजा कैंचा कोण आहे कोण आहे दुजा स्वरूपीं पाहतां ।
विचारें राहतां सुख आहे सुख आहे मूळ आपुलें शोधितां।
मनासी बोधितां रामदास
 
ज्याचेनि जितोसी त्यासी चुकलासी ।
व्यर्थ कां जालासी भूमिभार भूमिभार जिणें तुझें गुरूविणे।
वचनें प्रमाणें जाण बापा जाण बापा गुरूविण गति नाहीं ।
पडसी प्रवाहीं मायाजाळीं मायाजाळी व्यर्थ गुंतलासी मूढा ।
जन्मभरी ओढा ताडातोडी कांही ताडातोडी काही राम जोडी।
आयुष्याची घडी ऐसी वेंचीं ऐंसी वेंचीं बापा आपुली वयसा ।
दास म्हणे ऐसा काळ घाली।
 
विषयीं विरक्तपण इंद्रियेनिग्रहण गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे चंचळपणें मन न करी विषयध्यान ।
गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे बुध्दि बोधक जाण ब्रह्मानुभव पूर्ण ।
गरुकृपे वांचुनि नव्हे नव्हे भक्तिज्ञानपूर्ण सप्रेम संपूर्ण ।
गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे रामीरामदास म्हणे निर्गुणसुख लाधणे।
गुरूकृपे वाचुनि नव्हे नव्हे
 
सगुण हा देव धरावा निश्चित ।
तरी नाशवंत विश्व बोले विश्व बोले एका भजावें निर्गुण ।
परी लक्षवेना काय कीजे काय किजे आतां निर्गुण दिसेना ।
सगुण असेना सर्वकाळ सर्वकाळ गेला संदेहीं पडतां ।
कोणे वेळे आतां मोक्ष लाभे मोक्ष लाभे एका सद्गुरूवचनें ।
आत्मनिवेदनें रामदासीं
 
गरुविण प्राणी त्या होय जाचणी ।
सत्य माझी वाणी मिथ्या नव्हे मिथ्या नव्हे सत्य सांगतो तुम्हाला अंती यमघाला चुकेना की चुकेना की यमयातना या जना ।
वेगीं निरंजना ठाईं पाडा ठाई पाडा वेगीं निरंजन ।
लावा तनमन सद्गुरूसी सद्गुरूची नाहीं जयाला ओळखी तया झोंकाझोंकी यातनेची यातनेची चिंता चुके एकसरी ।
वेगीं गुरू करी दास म्हणे
 
आमुचा तो देव एक गुरूराव ।
द्वैताचा तो ठाव नाहीं जेथें गुरूने व्यापिले स्थिर आणि चर ।
पहा निर्विकार कोंदलासे रामीरामदास उभा तये ठाई।
माझी रामाबाई निर्विकार
 
श्रीगुरूकृपाज्योती ।
नयनीं प्रकाशली अवचिती तेथे कापूस नाही वाती ।
तैलविण राहिली ज्योती नाहीं सम ई दिवे लावणे ।
अग्निविण दीप जाणे रामीरामदास म्हणे ।
अनुभवाची हे खूण
 
त्रिभुवनासी क्षयरोग ।
एक सद्गुरू आरोग्य जे जे तया शरण गले ।
ते ते आरोग्य होऊनि ठेले शरण रामी रामदास ।
क्षयातीत केलें त्यास।
 
ब्रम्हांडचि तीर्थ जालें ।जयाचेनी एका बोलें ।।
सद्गुरूची पायवणी ।सकळ तीर्था मुकुटमणी ।।
रामीरामदास म्हणे । महिमा धाता तोही नेणें ।।
 
एक हेंअनेक, अनेक जें एक । अनुभवीं देख स्वानुभव ।।
कोठुनिया जालें कैसे आकारलें । वेदी वर्णियेलें ज्ञानकांडी ।।
तें गुज सद्गुरूकृपे कळों आलें । दास म्हणे जालें ब्रह्मरूप ।।
 
एक तो गुरू दुसरा एक सद्गुरू सद्गुरूकृपेवाचुनि न कळे ज्ञानविचारू पारखी नेणती ज्ञानी ओळखती ।
गुरू केला परि ते नाहीं आत्मप्रचिति म्हणोनि वेगळा सद्गुरू निराळा ।
लक्षांमध्यें कोणी एक साधु विरळा सद्य प्रचीति नसतां विपत्ति ।
रामदास म्हणे कैसी होईल रे गति।
 
सद्गुरू लवकर नेती पार ।।
थोर भयंकर दुस्तर जो अति। हा भवसिंधु पार ।।
षड्वैय्रादिक क्रुर महामीन । त्रासक हे अनिवार ।।
घाबरला मनिं तीव्र मुमुक्षु । प्रार्थित वारंवार ।।
अनन्यशरण दास दयाघन । दीनजनां आधार ।।
 
तुजविण गुरूराज कोण प्रतीपाळी ।
मायबाप कामा न ये कोणी अंतकाळीं जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोहीं ।
तुजविण मज वाटे तसें धांव लवलाही चकोरचंद्रन्याय जसा गाय माय बाळा ।
पाडसासी हरिणी जसी तेंवि तूं कृपाळा रामदास धरूनी आस पाहे वास दिवसरात ।
खास करिल काळ ग्रास, ध्यास हा मानसी।
 
गुरूवरें दातारें ।
अभिनव कैसें केलें .एकचि वचन न बोलत बोलुनि ।
मानस विलया नेलें भूतसंगकृत नश्वर ओझें ।
निजबोधें उतरिलें दास म्हणे मज मीपणाविरहित ।
निजपदीं नांदविलें
 
अपराधी आहे मोठा।
मारणें कृपेचा सोटा गुरुराज सुखाचे कंद ।
नेणुनि केला हा निजछंद ।
तेणें पावलों मी बंध ।
जालों निंद्य सर्वस्वीं तारीं तारीं सद्गुरुराया ।
वारीं माझे तापत्रया ।
तुझे पाय काशी गया ।
आहे मजला सर्वस्वीं आतां अंत पाहसी काय ।
तूंचि माझा बापमाय।
रामदास तुझे पाय ।
वारंवार वंदितो
 
त्रिविध तापहारक हे गुरूपाय।
भवसिंधूसी तारक हे गुरुपाय स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय।
ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय।
नयनीं श्रीराम दाविती हे गुरुपाय सहज शांतीचे आगर हे गुरुपाय।
पूर्णकृपेचे सागर हे गुरुपाय ।
सकळ जीवांसी पावन हे गरुपाय
 
शरण जावें संतजनां।
सत्य मानावें निर्गुणा नाना मतीं काय चाड ।
करणें सत्याचा निवाड ज्ञाने भक्तीस जाणावें ।
भक्त तयास म्हणावें रामीरामदास सांगे ।
सर्वकाळ संतसंग
 
संसार करावा सुखें यथासांग ।
परी संतसंग मनीं धरा मनीं धरा संतसंगतिविचार ।
येणें पैलपार पाविजेतो पाविजेतो याची प्रचीत पहावी ।
निरूपणी व्हावी अतिप्रीती अतिप्रीती तुम्ही निरूपणी धरा।
संसारी उध्दरा असोनिया असोनियां नाहीं माया सर्वकांहीं ।
विवंचूनि पाहीं दास म्हणे।
 
ज्या जैसी संगति त्या तैसीच गति ।
समागमें रीति सर्वकांहीं सर्वकांहीं घडे संगती गुणें ।
साधूचीं लक्षणें साधुसंगे साधुसंगें साधु होइजे आपण।
रामदास खूण सांगतसे
 
दुर्जनाचा संग होय मना भंग ।
सज्जनाचा योग सुखकारी सुखकारी संग संतसज्जनाचा ।
संताप मनाचा दुरी ठाके दुरी ठाके दु:ख सर्व होय सुख ।
पाहों जातां शोक आढळेना आढळेना लोभ तेथें कैंचा क्षोभ ।
अलभ्याचा लाभ संतसंगें संतसंगें सुख रामीरामदासी ।
देहसंबंधासी उरी नाही
 
 
प्रवृत्ति सासुर निवृति माहेर ।
तेथे निरंतर मन माझें माझे मनीं सदा माहेर तुटेना ।
सासुर सुटेना काय करूं काय करूं मज लागला लौकिक ।
तेणें हा विवेक दुरी जाय दुरी जाय हित मजचि देखतां ।
प्रेत्न करूं जातां होत नाहीं होत नाहीं प्रेत्न संतसंगेंविण ।
रामदास खूण सांगतसें
 
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधु ।
भूतांचा विरोधु जेथ नाहीं कल्पनेचा देहो त्या नाहीं संदेहो ।
सदा नि:संदेह देहातीत। जया नाहीं क्रोध जया नाहीं खेद ।
जया नाही बोध कांचनाचा रामदास म्हणे साधूचीं लक्षणें अति सुलक्षणें अभ्यासावीं
 
आमुचे सज्जन संत साधुजन ।
होय समाधान तयांचेनि तयांचेनि संगे पाविजे विश्रांति ।
साधु आदिअंतीं सारखेचि सारखेचि सदा संत समाधानी ।
म्हणोनियां मनीं आवडती आवडती सदा संत जिवलग ।
सुखरूप सदा संग सज्जनांचा सज्जनांचा संग पापातें संहारी ।
म्हणोनियां धरी रामदास
 
देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं ।
धुंडिताती नानापरी नाना शास्त्रें धांडोळती ।
जयाकारणें कष्टती रामदास म्हणे भावें ।
वेगीं संता शरण जावें
 
ब्रह्मादिकांसी दुर्लभ ।
देव भक्तांसी सुलभ थोरपणे आढळेना ।
जाणपणासी कळेना नाहीं योगाची आटणी ।
नाहीं तप तीर्थाटणी दास म्हणे साधूविण ।
नानासाधनांचा शीण
 
संतांचेनि संगे देव पाठीं लागे ।
सांडूं जातां मागें सांडवेना सांडवेना देव सदा समगामी ।
बाह्य अंतर्यामीं सारिखाचि सारिखाचि कडाकपाटीं खिंडारीं ।
गृहीं वनांतरीं सारिखाचि सारिखाचि तीर्थ सारिखाचि क्षेत्री ।
दिवा आणि रात्रीं सारिखाचि सारिखाचि अंत नाहीं तो अनंत ।
रामदासीं किंत मावळला
 
संत सज्जनांचा मेळा ।
त्यासि लोटांगण घाला तेथें जाऊनि उभे राहा ।
रामदास नयनीं पहा गुण श्रीरामाचे गाती ।
कथा रामाची ऐकती तेथे रामही असतो ।
कथा भक्तांची ऐकतो जेथें राम तेथें दास ।
सदृढ धरावा विश्वास
 
तुम्ही चिंता हो मानसीं ।
राम शरयूतीर निवासी रूप सांवळें सुंदर ।
ज्याला ध्यातसे शंकर जडित जडित कुंडलें श्रवणीं ।
राम लावण्याची खाणी सूर्यवंशाचें मंडण ।
राम दासाचें जीवन
 
शोभे ठकाराचें ठाण ।
एकवचनी एकबाण बाप विसांवा भक्तांचा ।
स्वामी शोभे हनुमंताचा मूर्ति शोभे सिंहासनीं ।
तो हा राजीव नयनी सूर्यवंशाचें मंडण ।
राम दासाचें भूषण
 
तो हा राम आठवावा ।
ह़दयांत सांठवावा रामचरणीची गंगा ।
महापातके जातीं भंगा रामचरणीची ख्याति ।
चिरंजीव हा मारुती चरण वंदी ज्याचे शिरी ।
बिभीषण राज्य करी शबरीची बोरें खाय ।
मोक्ष दिला सांगूं काय रामदास म्हणे भावें ।
कथा कीर्तन करावें
 
ऐसा नव्हे माझा राम ।
सकळ जीवांचा विश्राम नव्हे गणेश गणपाळु ।
लाडु मोदकांचा काळू नव्हे चंडी मुंडी शक्ति ।
मद्यमांसाते मागती नव्हे भैरव खंडेराव ।
रोटी भरितांसाठीं देव नव्हे जोखाई जोखाई ।
पीडिताती ठाईं ठाईं नव्हे भूत नव्हे खेत ।
निंब नारळ मागत रामदासी पूर्णकाम ।
सर्वांभूती सर्वोत्तम
 
सोडवि जो देव तोचि देवराव।
येर जाण नांव नाथिलेंचि नाथिलेंचि नांव लोकांमध्यें पाहे ।
ठेविजेत आहे प्रतापाचें प्रतापाचें नांव एका राघवासी ।
रामीरामदासी देवराव
 
अणुपासुनि जगदाकार ।
ठाणठकार रघुवीर रामाकार जाहली वृत्ती ।
द्रृश्याद्रृश्य नये हातीं रामीं हरपलें जग ।
दास म्हणे कैंचे मग
 
राज्य जालें रघुनाथाचें ।
भाग्य उदेलें भक्तांचें कल्पतरु चिंतामणी ।
कामधेनूची दुभणी परिस झालें पाषाण ।
अंगिकार करी कोण नाना रत्नांचे डोंगर ।
अमृताचें सरोवर पृथ्वी अवघी सुवर्णमय ।
कोणीकडे न्यावें काय ब्रह्मादिकांचा कैवारी ।
रामदासाच्या अंतरीं
 
स्वामी माझा ब्रह्मचारी ।
मातेसमान अवघ्या नारी उपजतांबाळपणीं ।
गिळूं पाहे वासरमणि आंगीं शेंदुराची उटी ।
स्वयंभ सोन्याची कांसोटी कानीं कुंडलें झळकती ।
मुक्तमाळा विराजती स्वामीकृपेची साउली ।
रामदासाची माउली।।
 
पडतां संकट जीवां जडभारी ।
स्मरावा अंतरी बलभीम बलभीम माझा सखा सहोदर ।
निवारी दुर्धर तापत्रय तापत्रय बाधा बाधूं न शके काहीं ।
मारुतीचे पायीं चित्त ठेवा ठेवा संचिताचा मज उघडला ।
कैवारी जोडला हनुमंत हनुमंत माझें अंगीचें कवच ।
मग भय कैचें दास म्हणे

संत रामदासांचे अभंग 201 ते 250
नांव मारुतीचे घ्यावें ।
पुढे पाऊल टाकावें अवघा मुहूर्त शकून ।
हृदयीं मारुतीचे ध्यान जिकडे जिकडे जाती भक्त।
पाठीं जाय हनुमंत राम उपासना करी।
मारुती नांदे त्यांचे घरीं दास म्हणे ऐसें करा ।
मारुती हृदयीं धरा
 
येई येई हनुमंता । माझे अंजनीच्या सुता ।।
तुझी पाहतो मी वाट । प्राणसखया मजला भेट ।।
तुजवांचोनि मज आतां । कोण संकटीं रक्षिता ।।
नको लावूं तूं उशीर । दास बहू चिंतातुर ।।
 
कष्टी झाला जीव केली आठवण ।
पावलें किराण मारुतीचें संसारसागरीं आकांत वाटला ।
भुभु:कार केला मारुतीनें मज नाही कोणी मारुती वांचोनी ।
चिंतिता निर्वाणीं उडी घाली माझे जिणें माझ्या मारुतीं लागलें।
तेणें माझें केले समाधान उल्हासले मन देखोनि स्वरूप ।
दास म्हणे रूप राघवाचें
 
मेरूचीया माथां देऊनिया पाव ।
जात असे राव कैलासींचा।
कैलासींचा राव अक्रावा क्षोभला ।
देशधडी केला लंकानाथ लंकेच्या चोहटा मांडियेला खेळ ।
आगीचे कल्लोळ घरोघरीं जाळियेलीं घरें सुंदर मंदिरें ।
पावला कैवारें जानकीच्या जानकीचा शोक दुरी दुरावला ।
यशवंत जाला निजदास।
 
पावावया रघुनाथ ।
जया मनीं वाटे आर्त ।
तेणें घ्यावा हनुमंत ।
करील भेटी हनुमंत मी नमी ।
मज भेटविलें रामी ।
विघ्नांचिया कोटी श्रेणी ।
अंतरोनी राम उपासकांवरी ।
अतिप्रेम पडिभरी ।
होऊनिया कैवारी ।
निवारी दु:ख रामीरामदासीं श्रेष्ठ ।
सिध्दसिध्दासी वरिष्ठ ।
भवाचा भरियेला घोंट ।
स्मरणमात्रें
 
मुख्य प्राणासी पुजिलें ।
रामदर्शन घडलें तुम्ही पहा हो मारुती ।
रामभक्तांचा सारथी देव अंजनीनंदन ।
रामदासी केलें ध्यान
 
कपिकुळाचें भूषण ।
चित्त रामाचें तोषण धन्य साधू हा हनुमंत ।
ज्ञान वैराग्य सुमंत रामरंगीं रंगे चित्त ।
अखंडित सावचित्त दास म्हणे मी लेकरूं ।
विस्तारवी बोधांकूरू
 
पंढरिऐसें तिन्हीं ताळीं ।
क्षेत्र नाहीं भूमंडळीं दुरूनि देखतां कळस ।
होय अहंकाराचा नाश होतां संताचिया भेटी ।
जन्ममरणा पडे तुटी चंद्रभागेमाजीं न्हातां ।
मुक्ति लाभे सायुज्यता दृष्टीं नपडे ब्रह्मादिकां ।
प्राप्त जालें तें भाविका रामदासा जाली भेटी ।
विठ्ठलपायीं दिधली मिठी
 
पंढरी नव्हे एकदेशी । विठ्ठल सर्वत्र निवासी ।।
आम्हीं देखिला विठोबा । आनंदे विटेवरीं उभा ।।
तेथे दृश्यांची दाटी मोठी । पाहतां रुक्मिणी दिसे दृष्टी ।।
रामदासीं दर्शन जालें ।आत्मविठ्ठला देखिलें ।।
 
राम कृपाकर विठ्ठ्ल साकार । दोघे निराकार एकरूप ।।
आमुचिये घरीं वस्ति निरंतरीं । हृदयीं एकाकारी राहियेले ।
रामदास म्हणे धरा भक्तिभाव । कृपाळु राघव पांडुरंग ।।
 
जें कां चैतन्य मुसावलें विटेवरी वासांवलें ।।
तो हा विठ्ठल उभा राहे । समचरणीं शोभताहे ।।
रामीरामदासीं पाहिलें । विठ्ठल आत्मया देखिलें ।।
 
माझें मानस विटेवरी । विठ्ठलचरणीं निरंतरीं ।।
पंढरपुरीं मनोरथ ज्याचा । धन्य धन्य तो देवाचा ।।
जो जो पंढरीस गेला । तेणे कळिकाळ जिंकिला ।।
रामदास म्हणे पंढरी । साधनेविण तारी ।।
 
लांचांवोनि भक्तिलोभा । असे वाळवंटीं उभा ।
पदकी इंद्रनीळशोभा । दिशा प्रभा उजळती ।।
भक्तें पुंडलिकें गोविला । जाऊं नेदी उभा केला ।
विटें नीट असे ठाकला । भीमातीर वाळुवंटीं ।।
केवढें भाग्य पुंडलिकाचें । उभें दैवत त्रिलोकींचें ।
की जें तारूं भवसागरींचें । भीमातीरीं विनटलें ।।
एकें पुंडलिकें करुनी जोडी । आम्हा दिधली कल्पकोडी ।
तुटली संसारसांकडी । रामदास म्हणतसे ।।
 
कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ।।
काय मागतों गांठोडी । बोलसीना धरली गुडी ।।
आशा वैभवाची नाही । भिऊं नको वद कांहीं ।।
नलगे मज धन दारा ।वेगे लोचन उघडा ।।
दास म्हणे वर पाहे । कृपा करूनी भेटावें ।।
 
सोनियाचा दिवस जाला । पांडुरंग रंगी आला ।।
मनी आतां सावध होई । प्रेमरंगी रंगुनि राहीं ।।
बोल कैसा सुपरित कांहीं । अनुसंधान विठ्ठलपायीं ।।
दास म्हणे हेचि युक्ती । एक देवासी चिंतिती ।।
 
आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरीं ।।
भावभक्ति श्रवण मनन । निदिध्यास साक्षात्कारपण ।।
चिच्छक्ति धर्मनदी । तरलों ब्ह्मास्मिबुध्दि ।।
तेथिंचा अहंकार तेंचि पोंवळी । त्यजोनी प्रवेशलों राउळीं ।।
रामदासी दर्शन जालें । आत्म्या विठ्ठलातें देखिलें ।।
 
राम अयोध्येचा वासी । तोचि नांदे द्वारकेसी ।।
कृष्ण नामातें धरिलें । बहु दैत्य संहारिँलें ।।
सखया मारुतीलागुनी । रूप दावी चापपाणी ।।
पुढे भूभार उतरिँला । पांडवासी सहाय जाला ।।
आतां भक्तांचियासाठी । उभा चंद्रभागेतटी ।।
राम तोचि विठ्ठल जाला । रामदासासी भेटला ।।
 
सहज बरवा सहज बरवा । सहज बरवा विठोबा माझा ।।
सहज सांवळा दिगंबर ।सहज कटीं कर ठेऊनि उभा ।।
रामीरामदास म्हणे ।सहज अनुभव तोचि जाणे ।।
 
शंकर – खंडोबा – भैरव नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ।।
शिरी जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ।।
अंगा लावूनिया राख । मुखी रामनाम जप। ।।
भक्ता प्रसन्न नानापरी । अभंयकर ठेऊनि शिरी ।।
दास म्हणे शिवशंकरा । दुबळ्यावरी कृपा करा ।।
 
माझा कुळस्वामी कैलासीचा राजा ।
भक्ताचिया काजा पावतसे पावतसे दशभुजा उचलून ।
माझा पंचानन कैवारी ।।
कैवारी देव व्याघ्राच्या स्वरूपें ।
भूमंडळ कोपें जाळूं शके जाळूं शके सृष्टि उघडितां दृष्टी ।
तेथें कोण गोष्टी इतरांची इतरांची शक्ति शंकराखालती ।
वांचविती क्षिती दास म्हणे
 
पृथ्वी अवघीं लिंगाकार । अवघा लिंगाचा विस्तार ।।
आतां कोठें ठेवूं पाव । जेथे तेथे महादेव ।।
अवघा रुद्रची व्यापिला ।ऐसे देवचि बोलिला ।।
दासे जाणोनिया भला ।देह देवार्पण केला।।
 
देव शिवाचा अवतार । जाउनि बसला गडावर ।।
एक निळ्या घोड्यावर । एक ढवळ्या नंदीवर ।।
एका विभूतीचे लेणें । एका भंडारभूषणें ।।
रामदासी एक जाला । भेदभाव तो उडाला ।।
 
सोरटीचा देव माणदेशी आला । भक्तीसी पावला सावकाश ।।
सावकाश जाती देवाचे यात्रेसी होति पुण्यराशी भक्तिभावें ।।
भक्तिभावे देवा संतुष्ट करावें संसारी तरावें दास म्हणे ।।
 
अनंत युगाची जननी । तुळजा रामवरदायिनी ।
तिचे स्वरूप उमजोनी । समजोनि राहे तो ज्ञाता ।।
शक्तिविणें कोण आहे । हें तो विचारूनि पाहे ।
शक्तिविरहित न राहे । यशकीर्त्तिप्रताप ।।
शिवशक्तिचा विचार । अर्धनारीनटेश्वर ।
दास म्हणे हा विस्तार । तत्वज्ञानी जाणती ।।
 
सोहं हंसा म्हणिजे तो मी मी तो ऐसे । हे वाक्य विश्वासे विवरावें ।।
विवरावें अहंब्रह्मास्मि वचन । ब्रह्म सनातन तूंचि एक ।।
तूंचि एक ब्रह्म हेचि महावाक्य । परब्रह्मीं ऐक्य अर्थबोध ।।
अर्थबोध रामीरामदासीं जाला । निर्गुण जोडला निवेदनें ।।
 
मायेभोवती भोंवावें तरी तिने कुरवाळावें ।।
संत एकटा एकला । एकपणाहि मुकला ।।
त्यासी माया असोनि नाहीं। ।आपपर नेणें काहीं ।।
रामीरामदासी माय । व्याली नाहीं चाटिल काय ।।
 
दृश्य सांडूनियां मागें । वृत्ति गेली लागवेगें ।।
माया सांडूनी चंचळ । जाला स्वरूपीं निश्चळ ।।
कांहीं भासचि नाडळे । वृत्ति निर्गुणीं निवळे ।।
चराचरातें सांडिलें । बहुविधें ओलांडिलें ।।
अवघें एकचि निर्गुण । पाहे वृत्तिच आपण ।।
रामदास सांगे खूण । वृत्ति तुर्येचें लक्षण ।।
 
ज्याचे नाम घेसी तोचि तूं आहेसी । पाहे आपणासी शोधूनियां ।।
शोधितां शोधितां मीपणचि नाहीं । मीपणाचें पाही मूळ बरें ।।
मूळ बरें पहा नसोनियां राहा ।आहां तैसें आहां सर्वगत ।।
सर्वगत आत्मा तोचि तूं परमात्मा । दास अहं आत्मा सांगतसे ।।
 
दिसें तें नासेल सर्वत्र जाणती। या बोला व्युत्पत्ति काय काज ।।
काज कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ।।
शाश्वतासी येणें जाणें हें न घडे । आकार न मोडे दास म्हणे ।।
 
छायेमाजी छाया लोपे । तरि काय परूष हारपे ।।
तैसा देह लोपतां । कदा न घडे मरण ।।
खेळाअंतीं डाव हारपत । तरी कां नटासि आला मृत्य ।।
रामदासी रामीं राम । जन्म मरण कैंचा भ्रम ।।
 
गेला स्वरूपाच्या ठायां । तिकडे ब्रह्म इकडे माया ।।
दोहींमध्यें सांपडलें । मीच ब्रह्मसें कल्पिलें ।।
ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपल ।।
तिकडे वस्तु निराकार । इकडे मायेचा विस्तार ।।
पुढे ब्रह्म मागें माया । मध्ये संदेहाची काया ।।
रामीरामदास म्हणे । इतुकें मनाचें करणें ।।
 
ब्रह्म हे जाणावें आकाशासारिखें ।
माया हे वोळखें वायू ऐसी वायू ऐसी माया चंचल चपळ ।
ब्रह्म ते निश्चळ निराकार निराकार ब्रह्म नाही आकारलें ।
रुप विस्तारलें मायादेवी मायादेवी जाली नांव आणि रूप ।
शुध्द सस्वरूप वेगळेचि। वेगळेचि परी आहे सर्वां ठायीं ।
रिता ठाव नाही तयांविणें तयाविणें ज्ञान तेचि अज्ञान ।
नाहीं समाधान ब्रह्मेविण ब्रह्मेविण भक्ति तेचि पै अभक्ति।
रामदासी मुक्ति ब्रह्मज्ञानी
 
अनंताचा अंत पहावया गेलों ।
तेणें विसरलों आपणासी आपणा आपण पाहतां दिसेना ।
रूप गवसेना दोहींकडें दोहीकडे देव आपणची आहे।
संग हा न साहे माझा मज माझा मज भार जाहला बहुत ।
देखतां अनंत कळों आला कळों आला भार पाहिला विचार।
पुढें सारासार विचारणा विचारणा जाली रामीरामदासीं ।
सर्वही संगासी मुक्त केलें मुक्त केले मोक्षा मुक्तीची उपेक्षा ।
तुटली अपेक्षा कोणी एक
 
ओळखतां ज्ञान ओळखी मोडली ।
भेटी हे जोडली आपणासी आपणासी भेटी जाली बहुदिसां ।
तुटला वळसा मीपणाचा मीपणाचा भाव भावें केला वाव।
दास म्हणे देव प्रगटला
 
मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं ।
जाणावा चतुरीं चोथादेहु चौथे देहीं सर्वसाक्षिणी अवस्था ।
ऐसी हे व्यवस्था चौदेहांची चौदेहांची गांठी शोधितां।
सुटली विवेके तुटली देहबुध्दि देहबुध्दी नाहीं स्वरूपीं पाहतां ।
चौथा देह आतां कोठें आहे कोठे आहे अहंब्रह्म ऐसा हेत ।
देहीं देहातीत रामदास
 
मायेचे स्वरूप ब्रह्मी उद्भवलें ।
तिच्या पोटी आलें महतत्व महतत्वीं सत्व सत्वीं रजोगुण ।
तिजा तमोगुण रजापोटीं पोटां पंचभूतें तयांचिया आली ।
दास म्हणे जाली सृष्टि ऐसी
 
स्वप्न वाटे सार तैसा हा संसार । पाहतां विचार कळोंलागे ।।
स्वप्न वेगींसरे संसार वोसरे । लालुचीच उरे दोहींकडे ।।
दास म्हणे निद्राकाळी स्वप्न खरें। भ्रमिष्टासी बरें निद्रासूख ।।
 
गळे बांधले पाषाणीं । आत्मलिंग नेणें कोणी ।।
जीव शिवाचें स्वरूप । कोण जाणें कैसें रूप ।।
लिंग चुकले स्वयंभ । धरिला पाषाणाचा लोभ ।।
रामीरामदास म्हणे । भेद जाणतीं शहाणे
 
अंत नाही तो अनंत । त्यासि दोरी करी भ्रांत ।।
ऐसें जनाचें करणें । कैसा संसार तरणें ।।
देव व्यापक सर्वांसी । त्यास म्हणती एकदेशी ।।
रामदासी देव पूर्ण । त्यासी म्हणती अपूर्ण ।।
 
जन्मवरी शीण केला । अंत:काळीं व्यर्थ गेला ।।
काया स्मशानीं घातली । कन्यापुत्र मुरडलीं ।।
घरवाडा तो राहिला । प्राणी जातसे एकला ।।
धनधान्य तें राहिलें । प्राणी चरफडीत गेले ।।
इष्टमित्र आणि सांगाती । आपुलाल्या घरां जाती ।।
दास म्हणे प्राणी मेले । कांहीं पुण्य नाहीं केलें ।।
 
कल्पनेची भरोवरी । मन सर्वकाळ करी ।।
स्वप्न सत्यचि वाटलें । दृढ जीवेसीं धरिलें ।।
अवघा मायिक विचार । तोचि मानिला साचार ।।
नानि मंदिरें सुंदरे । दिव्यांबरें मनोहरें ।।
जीव सुखें सुखावला । थोर आनंद भासला ।।
रामदास म्हणे मद । लिंगदेहाचा आनंद ।।
 
नवस पुरवी तो देव पूजिला ।
लोभालागीं जालां कासाविस कासाविस जाला प्रपंच करितां ।
सर्वकाळ चिंता प्रपंचाची प्रपंचाची चिंता करितांचि मेला ।
तो काय देवाला उपकार उपकार जाला सर्व ज्यां लागोनि ।
ते गेलीं मरोनि पाहतसे पहातसे पुढें आपणहि मेला ।
देवासि चुकला जन्मवरी
 
कर्ता एक देव तेणें केलें सर्व । तयापासी गर्व कामा नये ।।
देह हें देवाचें वित्त कुबेराचें ।
तेथें या जीवाचें काय आहे देता देवविता नेता नेवविता ।कर्ता करविता जीवा नव्हे ।।
निमित्ताचा धणी केला असे प्राणी ।पाहतां निर्वाणीं जीव कैचा ।।
लक्षुमी देवाची सर्व सत्ता त्याची । त्याविण देवाची उरी नाहीं ।।
दास म्हणे मना सावध असावें । दुश्चित नसावे सर्वकाळ ।।
 
नको करू अभिमान । होणार तें देवाधीन ।।
बहू द्रव्यानें भुलले । काळें सर्वहि ग्रासिलें ।।
जे जे म्हणती मी शक्त। ते ते जाहले अशक्त ।।
रामदास सांगे वाट । कैसा होईल शेवट ।।
 
अर्थेविण पाठ कासया करावें । व्यर्थ कां मरावें घोकुनियां ।।
घोकुनियां काय वेगीं अर्थ पाहें । अर्थरूप राहे होउनियां ।।
होउनियां अर्थ सार्थक करावें । रामदास भावें सांगतसे ।।
 
माजीं बांधावा भोपळा । तैसी बांधू नये शिळा ।। .
घेऊं येतें तेंचि घ्यावें । येर अवघेंचि सांडावें ।।
विषयवल्ली अमरवल्ली । अवघीं देवेचि निर्मिली ।।
अवघें सृष्टीचें लगट । करुं नये कीं सगट ।।
अवघें सगट सारिखेंची । वाट मोडली साधनाची ।।
आवघेचि देवे केलें । जें मानेल तेंचि घ्यावें ।।
दास म्हणे हरिजन । धन्य जाणते सज्जन ।।
 
त्रैलोक्याचें सार वेदा अगोचर । मंथुनी साचार काढियेले ।।
तें हें संतजन सांगती सज्जन । अन्यथा वचन मानूं नये ।।
जें या विश्वजनां उपयोगी आलें । बहुतांचें जालें समाधान ।।
रामीरामदासीं राघवीं विश्वास । तेणें गर्भवास दुरी ठेला ।।
 
वेधें बोधावें अंतर ।भक्ति घडे तदनंतर ।।
मनासारिखें चालावें । हेत जाणोनि बोलावें ।।
जनी आवडीचे जन । त्याचे होताती सज्जन ।।
बरें परिक्षावें जनां । अवघें सगट पिटावेना ।।
दास म्हणे निवडावे ।लोक जाणोनियां घ्यावे ।।
 
एक उपासना धरीं ।भक्ति भावें त्याची करीं ।।
तेणें संशय तुटती । पूर्वगुण पालटती ।।
सर्व नश्वर जाणोन वृत्ति करी उदासीन ।।
सत्य वस्तूच साचार ।त्याचा करावा विचार ।।
त्यागोनियां अनर्गळ । सदा असावें निर्मळ ।।
ध्याने आवरावें मन । आणि इंद्रियदमन ।।
अखंड वाचे रामनाम ।स्नान संध्या नित्यनेम ।।
दास म्हणे सर्वभाव । जेथे भाव तेथें देव ।।
 
दु:खे दु:ख वाढत आहे । सुखे सुख वाढत आहे ।।
बय्रानें बरेचि होते । वाईटें वाईट येतें ।।
हटानें हट वळावें । मिळतां मिळणी फावें ।।
सुशब्दे माणुस जोडें । कुशब्दे अंतर मोडें ।।
प्रीतीनें प्रीतीच लागे । विकल्पें अंतर भंगें ।।
सेवके दास्य करावें । राघवें प्रसन्न व्हावें ।।

संत रामदासांचे अभंग 251 ते 271
माता पिता जन स्वजन कांचन । प्रियापुत्रीं मन गोवू नको ।।
गोवू नको मन राघवेंवांचोनी । लोकलाज जनीं लागलीसे ।।
लागलीसे परी तुवां न धरावी । स्वहितें करावी रामभक्ति ।।
रामभक्तिविण होसिल हिंपुटी । एकलें शेवटीं जाणें लागे ।।
जाणें लागे अंती बाळा सुलक्षणा । ध्याई रामराणा दास म्हणे ।।
 
देव पाषाण भाविला । तोचि अंतरीं दाविला ।।
जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथें ।।
दृष्य बांधोनिया गळां । देव जाहला निराळा ।।
दास म्हणे भावातीत । होतां प्रगटे अनंत ।।
 
जाला स्वरुपीं निश्चय ।तरि कां वाटतसे भय ।।
ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणां आपण ।।
क्षण एक निराभास । क्षणें म्हणे मी मनुष्य ।।
रामीरामदास म्हणे । देहबिध्दीचेनि। गुणे ।।
 
स्नान संध्या टिळेमाळा । पोटी क्रोधाचा उमाळा ।।
ऐसे कैसें रे सोवळें। । शिवतां होतसे ओवळें ।।
नित्य दांडितां हा देहो परि फिटेना संदेहो ।।
बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ ।।
नित्यनेम खटाटोप ।मनीं विषयाचा जप ।।
रामदासी द्रुढ भाव । तेणेविण सर्व वाव ।।
 
स्नान संध्या टिळेमाळा । पोटी क्रोधाचा उमाळा ।।
ऐसे कैसें रे सोवळें। । शिवतां होतसे ओवळें ।।
नित्य दांडितां हा देहो परि फिटेना संदेहो ।।
बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ ।।
नित्यनेम खटाटोप ।मनीं विषयाचा जप ।।
रामदासी द्रुढ भाव । तेणेविण सर्व वाव ।।
 
एक लाभ सीतापती । दुजी संतांची संगती ।।
लाभ नाही यावेगळा ।थोर भक्तीचा जिव्हाळा ।।
हरिकथा निरूपण । सदा श्रवणमनन ।।
दानधर्म आहे सार । दास म्हणे परोपकार ।।
 
पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।।
याचें सार्थक करावें ।आपणासी उध्दरावें ।।
बहुत जन्मांचे शेवटीं । नरदेह पुण्यकोटि ।।
रामदास म्हणे आतां । पुढती न लाभे मागुतां ।।
 
तीर्था जाती देखोवेखी। तेथे कैसी होतें पाखी ।।
पाप – गेलें पुण्य जालें । कैसे प्रत्ययासी आलें ।।
दोषापासूनि सूटला । प्राणी मुक्त कैसा जाला ।।
म्हणती जाऊ वैकुंठासी । कैसें येते प्रत्ययासी।।
रामदास म्हणे हित । कैसें जाहलें। स्वहित ।।
 
मन – कर्णिकेमाझारी ।स्नानसंकल्प निवारी ।।
स्नान केलें अंतरंगा । तेणें पावन जाली गंगा ।।
गुरुपायी शरण प्रेमें । तोचि त्रिवेणीसंगम ।।
रामकृपेचे वाहे जळ। रामदासी कैसा मळ ।।
 
आत्मारामेविण। रितें । स्थळ नाहीं अनुसरतें ।।
पाहतां मन बुध्दि लोचन । रामेविण न दिसे आन ।।
सवडी नाहीं तीर्थगमना । रामें रुधिलें त्रिभुवन ।।
रामदासी। तीर्थभेटी । तीर्थ राम होउनि उठी ।।
 
परमेष्ठी परब्रह्म। । तोचि माझा आत्माराम। ।।
कैसें केलें संध्यावंदन । सर्वां भूतीं हो नमन ।।
नाहीं आचमनासी ठावो । तेथे नामचि जालें वावो ।।
जेथें हरपले त्रिकाळ । ऐसी संध्येसि साधली वेळ ।।
कळिकाळा तीन चूळ पाणी । रामदास दे सांडुनी ।।
 
पूर्वोच्चरिते ओंकार । प्रणवबीज श्री रघुवीर ।।
ब्रह्मयज्ञ कैसा पाहें । अवघें ब्रह्मरुप आहे ।।
देवर्षि पितृगण । तृप्ति श्रीरामस्मरण ।।
सव्य अपस्व्य भ्रांति । ब्रह्म नि:संदेह स्थिति ।।
आब्रह्मस्तंभ पर्यंत । राम सबाह्य सदोदित ।।
दासीं ब्रह्मयज्ञ सफळी । संसारासी तिळांजुळी ।।
 
अनित्याचा भ्रम गेला । शुध्द नित्यनेम केला ।।
नित्यानित्य हा विचार । केला स्वधर्म आचार ।।
देहबुध्दि अनर्गळ । बोधें फिटला विटाळ ।।
रामदासी ज्ञान जालें । आणि स्वधर्म रक्षिलें ।।
 
एकादशी नव्हे व्रत । वैकुंठीचा महापंथ ।।
परी रुव्मांगदाऐसा ।व्हावा निश्चय मानसा ।।
एकादशीच्या। उपोषणे । विष्णुलोकीं ठाव घेणें ।।
रामीरामदास म्हणे । काय प्रत्यक्षा प्रमाण ।।
 
क्षीरापतीची वाटणी । तेथें जाली बहु दाटणी ।
पैस नाहीं राजांगणी। कोणालागी ।। रंगमाळा नीरांजने ।
तेथें वस्ती केली मनें । दिवस उगवतां सुमनें। कोमाईली ।।
रथ देवाचा ओढिला । यात्रेकरा निरोप जाला । पुढें जायाचा गल्बला ।
ठायीं ठायीं ।। भक्तजन म्हणती देवा । आतां लोभ असों द्यावा ।
बहु सुकृताचा ठेवा । भक्ति तुझी ।।
दास डोंगरी राहतो । यात्रा देवाची। पाहतो ।
देव भक्तासवें जातों । ध्यानरुपे ।।
 
गेला प्रपंच हातींचा । लेश नाही परमार्थाचा ।।
दोहींकडें अंतरला । थोरपणें भांबावला ।।
गेली अवचितें निस्पृहता। नाहीं स्वार्थहि पुरता ।।
क्रोधे गेला। संतसंग । लोभें जाहला वोरंग ।।
पूर्ण जाली नाहीं आस । इकडे बुडाला अभ्यास ।।
दास म्हणे क्रोधे केलें । अवघे लाजिरवाणें जालें ।।
 
थोर अंतरी भडका । आला क्रोधाचा कडका ।।
नित्य निरूपणी बैसे । अवगुण जैसे तैसे ।।
लोभें भांबावले मन । रुक्यासाठी। वेंची प्राण ।।
दंभ विषयीं वाढला । पोटीं कामें खवळला ।।
मदमत्सराचा कांटा । अहंकारें धरीं ताठा ।।
दास म्हणे जालें काय । श्रोती। राग मानू नये ।।
 
हो कां मुमुक्षु अथवा मुक्त । आहे विषयांचा आसक्त ।।
विवेकवैराग्यसंग्रह ।करणें लागे यावद्देह ।।
रामीरामदास म्हणें । शांति ज्याच्या दृढपणें ।।
 
वृध्द ते म्हणती संसार करावा । जनाहातीं घ्यावा म्हणुनी बरें ।।
म्हणताती जन बरें ते कोणाला । बुडविती त्याला ऐशा बोधी ।।
वैश्वदेव दान अतिथी तो घडें । टाकी एकीकडे केले दोष ।।
मूर्ख तो म्हणाला काय जी वाल्मिक । टाकितां सकळिक मुक्त जाला ।।
रामदास म्हणे कथिलें। जे वेदीं । तया मात्र बंदी इतर थोर ।।
 
सर्वस्व बुडती ऐसी जे मातोक्ती। न धरावी चित्तीं साधकांनी ।।
भरत तो मूर्ख काय होतां सांग। मातेचा तो त्याग। केला जेणें ।।
पित्याने त्यागिलें। दैत्येद्रें प्रल्हादें । कां त्यासी गोविंदें स्नेह केला ।।
दैत्य बिभीषणें टाकीयेला बंधु । रामासी संबंधु। जोडियेला ।।
रामदास म्हणे। शुक्र होतां गुरू । परंतु दातारु। धन्य। बळी ।।
 
अनन्याचे पाळी लळे । पायीं ब्रीदावळी रुळे ।।
महामृदगलाचें प्रमें । रणछोडी आला राम ।।
तारी तुकयाचचे पुस्तक । देव ब्रह्मांनायक ।।
कृष्णातीरीं हाका मारी । दासा भेटी द्या अंतरीं।।