testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

करूणात्रिपदीतील पहिले पद

datta jayanti
वेबदुनिया|
शांत होई श्रीगुरूदत्ता। मम चित्ता शमवी आता ।।धृ.।।
तूं केवळ माता जनिता। सर्वथा तूंचि हितकर्ता।। तूं आप्त स्वजन भ्राता। सर्वथा तूंचि रे त्राता। भयकर्ता तूं भयहर्ता। दंडधर्ता तूं परिपाता। तुजवांचुनि न दुजी वार्ता। तूं आर्ता आश्रयदाता।।शांत हो.।। 1।। > अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसि यथार्था। तरि आम्ही जाउनि गाथा। तव चरणीं नमवूं माथा । तूं तथापि दंडिसि देवा। कोणाचा मग करूं धावा। सोडविता दुसरा तेव्हां। कोण दत्ता आम्हां त्राता।।शांत हो.।।2।।> तूं नटसा होउनि कोपी। दंडिताहि आम्ही पापी। पुनरपिही चुकत तथापि। आम्हांवरि नच संतापी। गच्छत: स्खलनं क्वापी। असें मानुनि नच हो कोपी निज कृपालेश रे ओपी। आम्हांवरि तूं भगवंता।।शांत हो.।।3।।

तव पदरीं असता ताता। आडमार्गी पाउल पडतां। सांभाळुनि मार्गावरता। आणिता न दुसरा त्राता बिरूदा आणुनि चित्ता। तूं पतितपावन दत्ता। वळे आतां आम्हांवरता। करूणाघन तूं गुरुनाथा।।शांत हो.।।4।।

सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हे घरदार। तव पदीं अर्पुं असार। संसारराहित हा भार। परिहारिसी करूणासिंधो। तूं दीनानाथ सुबंधो। आम्हां अघलेश न बाधो। वासुदेव प्रार्थित दत्ता।।शांत हो.।। 5।।


यावर अधिक वाचा :

शिरडीच्या साईबाबांचे 10 रहस्य जाणून घ्या

national news
साईबाबा शिरडीत येण्यापूर्वी कुठे होते? शिरडीत आल्यावर ते शिरडी सोडून निघून गेले होते आणि ...

आकाशात रंगणार अद्भुत सोहळा

national news
अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना येत्या बुधवारी ...

भंडारकवठ्याची भाकणूक

national news
भीमा नदीच्या काठी वसलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे श्री शिवयोगी ...

का करतात हात जोडून Namaskar

national news
आपण जेव्हाही कोणाला भेटतो तर पाया पडतो किंवा हात जोडून नमस्कार करतो.

गुरुवारी हे 7 उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील

national news
गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्त्व असत. गुरु भाग्य आणि धर्माचा कारक ग्रह मानला ...

राशिभविष्य