सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (15:39 IST)

दत्ताचा नामजप, योग्य पद्धत जाणून घ्या

देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. देवतेची तारक व मारक अशी दोन रूपे असतात. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.
 
दत्ताचा तारक-मारक संयुक्त नामजप योग्य उच्चारासह कसा करावा, हे सांगितले आहे.
 
नामजपाची योग्य पद्धत
‘श्री गुरुदेव दत्त ।’ 
 
या नामजपातील ‘गुरुदेव’ हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. ‘गुरुदेव’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून ‘दत्त’ हा शब्द म्हणावा. तो म्हणताना ‘द’ वर जोर द्यावा.