testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तुळशी विवाह

वेबदुनिया|
एका पुजोत्सव हरीविष्णूचा तुळशीशी विवाह लावणे असा याची विधी आहे. विवाहाच्या पूर्व दिवशी
तुळशीवृंदावन सारून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस व झेंडूची फुलांची झाडे उभी करतात. तुळशीच्या मुळाशी चिंचा व आवळे ठेवतात. तुळशी विवाह कार्तिकी एकादिवशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी करावा त्यात उत्तरा भाद्रपद, रेवती व अश्विनी ही नक्षत्रे तुळशी विवाहाला श्रेष्ठ मानण्यात आले आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह झाल्या नंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांच समाप्ती करतात. व चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान करून मग स्वत: सेवन करतात. तुळशी ‍ही घरोघरी असणारी एक अत्यंत पवित्र व उपयुक्त वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबीयांच्या घरासमोर वृंदावन असते. आजकाल जागेअभावी वृंदावन बांधणे शक्य नाही म्हणून मातीच्या कुंडीत तुळशीचे रोप लावतात. तुळशी ही कृष्णध्वज राजाची कन्येच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे नाव पडते. तुळशीचे महत्त्व आणि माहात्म्य अनन्यसाधारण आहे. देवपूजा श्राद्ध यासाठी तुळस अवश्य लागते. भगवान श्रीविष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशीला हिरप्रिया म्हणतात. > > आरोग्य दृष्टाही तुळस मानवाला अतिशय उपायकारक ठरली आहे. तुळशीत कार्बोजिक अ‍ॅसिड वायू शोषून घेऊन ऑक्सीजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास उपयोग होतो. दारात तुळशीचे झाड असेल की, घरात पिसवा व हिवतापाचे जंतू सहसा शिरकाव करीत नाही. श्रीकृष्ण जीवनी, वृंदा, वृंदावती, श्रीदेवी, नंदिनी, लक्ष्मी, महालक्ष्मी अशी ही तुळशीचे नावे आहे. जेथे आहे तुळशीचे पान तेथे वसे नारायण अशी संत बहीणा बाईने तुळशी महात्म्याची थोरवी गायली आहेत.


यावर अधिक वाचा :

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

कोकिलाव्रत कथा

national news
ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या ...

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

national news
बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या ...

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

राशिभविष्य