गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

दिवाळीत टाळा या 4 गोष्टी

उशिरापर्यंत झोपणे योग्य नाही
काही काम असे आहे जे शुभ दिवशी करणे योग्य नाही. तसेच दिवाळीच्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे योग्य नाही. या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठावे. तसेच दिवाळीला सांयकाळी झोपणे टाळावे. याने दारिद्रय येतं.
 
वडीलधार्‍यांना आदर द्यावा
या ‍शुभ दिवशी मोठ्यांचा आदर ठेवावा. त्यांच्यासोबत प्रेमाने वागावे व बोलावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातील वातावरण बघून वास करू पाहते. 
 
वाद टाळा
यादिवशी भांडण, वाद, क्लेश टाळावे. चिडचिड करणेही योग्य नाही. घरामध्ये शांत आणि आनंदी वातावरण असावे.
 
नशा नको
दिवाळीच्या दिवशी कोणत्याही प्रकाराचा नशा करणे योग्य नाही. नशा केल्याने घरातील पवित्रता नष्ट होते. हा धार्मिक सण आनंदाने घालवण्यासाठी नशा करणे टाळावे.