testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दिवाळीत गो-पूजेचे महत्त्व

diwali
वेबदुनिया|
भारतीय संस्कृतीत देवांनी सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते. परमात्मा हा सर्वच ठिकाणी असतो. जीवनाच्या
विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादीत न राहता 'सर्वभूतहिते' हा त्याचा मुख्य आदर्श आहे. प्राणीमात्रावर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आपण देवांवर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्यांची पूजा करतो. म्हणूनच प्राण्यांमध्ये जर देव वसत असतील तर त्यांच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे. त्यांवर प्रेम केले पाहिजे. म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या अंत:करणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे. भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावयास शिकविते. पृथ्वीतलावर गायीचे महत्त्व खूप जास्त आहे.
'गोभिर्विप्रैश्च वेदैश्च सतीभि: सत्यवादिभि:। अलुब्धै: दानशूरैश्च सप्तभिर्धार्यते मही:।।' > > 'गाय, ब्राह्मण, वेद, सती, सत्यवादी, निर्लोभी व दानशूर यांना पृथ्वीने धारण केले आहे. ऋषींनी गायीवर प्रेम करण्यास सांगितले, त्यावेळी कदाचित हिंदू हा शब्द प्रचलितही नसेल. म्हणून गाईला केवळ हिंदू धर्माचे प्रतीक मानणे चुकीचे ठरेल. मानवेतर सृष्टीवरही प्रेम करणे हेच गो-पूजेतून सांगितले जाते. मोहम्मद पैंगंबर यांनीही कुराणातून गाईच्या निर्दोषत्वाचे व प्रसन्नतेचे वर्णन करून गो-पूजा करावी असे सांगितले आहे.
गाय मानवाला आपले सर्वस्व देते. गाईचे दूध पिऊनच मानव धष्टपुष्ट बनतो. गाय शेतात काम करून शेती पिकवते. त‍िच्या शेणाने उपयुक्त असे खत मिळते. गोमुत्र अनेक रोगांसाठी रामबाण औषध ठरते. जिने असे अनंत उपकार मानवावर केले आहेत तिच्या प्रती जर आपण कृतज्ञ राहिलो नाही तर हा मानवतेवर कलंक ठरेल.


यावर अधिक वाचा :

शनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज

national news
शनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...

ओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश ।

national news
अस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं! हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे ...

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे

national news
कौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची ...

बघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण

national news
1*संतान गणपती- संतान प्राप्तीसाठी विशिष्ट मंत्रासह संतान गणपतीची मूर्ती दारावर लावली. 2* ...

गणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...

national news
गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...

राशिभविष्य