शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (16:47 IST)

दिवाळीत मुख्य दार या 5 वस्तूंनी सजवा, 5 फायदे होतील

आपल्या घराचे दारच आपल्या आयुष्यात सौख्य, आनंद, समृद्धी आणि शांततेचे दार उघडतात. हे दार तुटलेले, एक पटाचे, त्रिकोणी, वर्तुळाकार, चौरस किंवा बहुभुजी आकाराचे, दाराच्या मध्ये दार असणारे, खिडक्या असलेले दार नसावे. 
 
चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या 5 गोष्टीने दार सजवावे
1 तोरण - मुख्यदारात आंबा, पिंपळ, अशोकाच्या पानांचे तोरण लावल्याने वंशात वाढ होते. तोरण या गोष्टीचे प्रतीक आहे की देव या तोरणाच्या वासाने आकर्षित होऊन घरात शिरकाव करतात.
 
2 मांडना - याला चौसष्ट कलांमध्ये स्थान देण्यात आले आहे. याला अल्पाना देखील म्हणतात. दाराच्या समोर किंवा दाराच्या भिंतीवर देखील याला बनवतात. या मुळे घरात शांतता आणि शुभता राहते. मांडण्याच्या पारंपरिक रुपेत भूमितीय आणि फुलांच्या आकृतीसह त्रिकोणी, चौरस, वर्तुळाकार, कमळ, घंटाळी, स्वस्तिक, शतरंजाचे बोर्ड, अनेक सरळ रेषा, लहरी आकार इत्यादी मुख्य आहेत. या आकृत्या घरात सौख्य समृद्धी सह उत्साहाचा संचार करते.
 
3 पंच सुलक आणि स्वस्तिक - पंचसुलक हे पाच घटकांचे प्रतीक असून उघड्या तळहाताचे ठसे असतात. हे दाराच्या जवळपास बनवतात. याच बरोबर स्वस्तिक देखील बनवतात. सौभाग्यासाठी याच चिन्हाचा वापर आणि महत्त्व शास्त्रात सांगितले आहेत.
 
4 गणेशाची आकृती - गणपती गजाननाच्या मूर्तीला दाराच्या बाहेर वरील बाजूस लावतात. जर बाहेर लावत असल्यास घराच्या आत देखील दारावर लावणं महत्त्वाचं असतं. या मुळे घरात कोणत्याच प्रकाराची आर्थिक अडचण होतं नाही आणि घराची सुरक्षा कायम राहते. 
 
5 उंबरठा सुंदर आणि बळकट असावा - दाराचा उंबरा फारच सुंदर आणि बळकट असावा. मांगलिक प्रसंगी देवाच्या पूजे नंतर उंबऱ्याची पूजा करतात. उंबऱ्याचा दोन्ही बाजूस स्वस्तिक बनवून त्याची पूजा करावी. स्वस्तिक वर तांदुळाचे ढीग ठेवावे आणि एक-एक सुपारीवर कलावा बांधून त्याला ढिगाऱ्यावर ठेवावे. हे उपाय केल्याने धनलाभ होतो.