बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (12:12 IST)

पुढच्या वर्षी दिवाळी अकरा दिवस लवकर

पुढील वर्षी दिवाळी अकरा दिवस अगोदर येईल. ७ नोव्हेंबरला बुधवारी लक्ष्मी-कुबेरपूजन आहे. या दिवशी लक्ष्मी-कुबेरपूजनास शुभमुहूर्त सायंकाळी ६-०२ पासून रात्री ८-३५ पर्यंत आहे. गुरुवार बलिप्रतिपदेला सकाळी ६.४३ ते ८.०८ शुभ, सकाळी १०.५८ ते १२.२३ चल, दुपारी १२.२४ ते १.४८ लाभ, दुपारी १.४९ ते ३.१३ अमृत आणि सायं. ४.३८ ते ६.०१ शुभ या चौघडीत वहीपूजन, लेखन प्रारंभ करा, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तर, पुढील वर्षी दिवाळी अकरा दिवस अगोदर येईल. रविवार, २७ आॅक्टोबरला नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन एकाच दिवशी आहे, असे सोमण म्हणाले.