शनिवार, 8 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : मंगळवार, 14 जानेवारी 2025 (12:38 IST)

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

Tilgud Barfi
साहित्य
तीळ
गूळ
तूप
आवश्यकतेनुसार पाणी
सुकामेवा
कृती-
सर्वात आधी तीळ स्वच्छ करून घ्यावी. नंतर भाजून घ्यावी. तसेच थंड झाल्यानंतर मिक्सर मधून बारीक दळून घ्यावी. आता एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये गूळ घालावा. आवश्यक असल्यास अगदी थोडे पाणी घालावे. आता हे ढवळत राहावे जेणेकरून मिश्रण कढईला चिकटणार नाही. आता या मिश्रणात बारीक केलेली तीळ घालावी. व चांगल्या प्रकारे एकत्रित करावे.यानंतर यामध्ये सुकामेवा घालावा. आता एक ताटलीला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालावे. आता तुम्हाला हव्या त्या आकारात वड्या कापून अकरा द्यावा. तर चला तयार आहे आपली संक्रांति विशेष तिळगुळाची बर्फी रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik