1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:39 IST)

Dhantrayodashi 2021: धनतेरसला संध्याकाळी 13 दिवे लावा, समाजात प्रतिष्ठा वाढेल, धनात वृद्धी होईल

Light 13 lamps in the evening on Dhantrayodashi
आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे..निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी राहो यासाठी देवाची आराधना...तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतात परंतू पूजेसह काही सोपे कामं केले तर धनासंबंधी अडचणी दूर करता येऊ शकतात. कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या 13 पटीने लाभ होतो असेही म्हणतात....
 
तर जाणून घ्या आपल्याला काय करायचे आहे.
* सर्वात आधी संध्याकाळी 13 दिवे प्रज्वलित करावे. तिजोरीत कुबेराचे पूजन करावे. नंतर चंदन, धूप, दीप, नैवेद्य याने पूजन झाल्यावर आरती करावी आणि मंत्र पुष्पांजली अर्पित करावी.
 
* आता मुख्य गोष्टीकडे वळू या की या दिवशी संध्याकाळी 13 दिवे लावावे आणि त्याजवळ 13 कवड्या ठेवाव्या. नंतर या कवड्या घरातील एखाद्या कोपर्‍यात दाबून द्या. याने अचानक धन लाभ होण्याचे योग बनतील.
 
* या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे. याने दारिद्र्य, काळोख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
 
* या व्यतिरिक्त प्रयत्न करावा की या दिवशी घरातील प्रत्येक सदस्यासाठी भेटवस्तू आणावी. कुटुंबातील लोकांसाठी खरेदी करावी... इतर लोकांसाठी गिफ्ट या दिवशी खरेदी करू नये.
 
* जर आपल्याकडे धन टिकत नसेल म्हणजे पैसा येत असेल परंतू काही कारणामुळे खर्च होऊन जात असेल तर धनत्रयोदशी ते लक्ष्मी पूजनापर्यंत पूजा दरम्यान देवी लक्ष्मीला एक जोडी लवंगा चढवाव्या.
 
* या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढर्‍या वस्तूंचे दान केल्याने धनाची कमी होत नाही. अशाने जमा पुंजी वाढते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात.
 
* या दिवशी किन्नरला दान करावे आणि त्याच्यांकडून एक शिक्का मागून घ्यावा. किन्नरने स्वखुशीने शिक्का दिल्यास तर अजूनच फलदायी ठरेल. हा शिक्का आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच धनाची कमी जाणवत नाही.
 
* या दिवशी दारावर गरजू, भिकारी किंवा कोणीही मागणारे आले तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये. त्यांना यशाशक्ती दान करावे.
 
* आपल्या एखाद्या कामात यश मिळवण्याची इच्छा असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी त्या झाडाचे डहाळी तोडावी ज्या झाडावर वटवाघळं बसत असतील. ही डहाळी घरातील ड्राइंग रूममध्ये ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृद्धी होते.
 
* या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन केळाचे झाड किंवा एखादे सुवासिक झाड लावावे. जसं जसं झाडं मोठे होईल तसं तसं यश वाढत जाईल.
 
* या दिवशी वाद, भांडण टाळावे. घरात शांती आणि सकारात्मकता राहू द्यावी.
 
* धनत्रयोदशीच्या पूजेपूर्वी आणि नंतर दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून घराच्या चारी बाजूला शिंपडावे. याने लक्ष्मीचे आगमन होतं. या व्यतिरिक्त हे पाणी पूजेत सामील लोकांवर देखील शिंपडावे. याने मन पवित्र आणि वातावरण शुद्ध राहतं.