मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

पैशांचा पाऊस पडेल... धनत्रयोदशीला या पैकी एक काम केलं तरी...

धनत्रयोदशी या सणाच्या नावातच धन हा शब्द आहे अर्थात या दिवशी पूजा धनवान होण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी पूजा-पाठ आणि ज्योतिष उपाय केले जातात. तुम्हालाही संपत्ती आणि समृद्धी हवी असेल तर धनतेरसला ही कामे-
 
1. धणे आर्थिक समस्या दूर करतील: धनत्रयोदशीच्या दिवशी अख्खे धणे खरेदी करा आणि नंतर त्याची पूजा करा आणि भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. यानंतर तुमची इच्छा सांगून जरा धणे बागेत पेरा आणि काही लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमची आर्थिक समस्या लवकरात लवकर दूर होईल. असे केल्याने धनाचे नुकसान होत नाही.
 
2. दिव्याचे दान केल्याने मिळेल कर्जापासून मुक्ती : या उपायामध्ये घरातील सर्व सदस्यांनी घरी आल्यानंतर जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी एका जुन्या दिव्यात मोहरीचे तेल टाकून दिवा लावाला जातो. मग तो घरभर फिरवला जातो आणि त्यानंतर हा दिवा घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून नाल्याजवळ किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ ठेवला जातो. यानंतर दिव्याला जल अर्पण करताना या मंत्राचा जप केला जातो.
मृत्युना पाशहस्तेन कालेन भार्यया सह।
त्रयोदश्यां दीपदानात्सूर्यज: प्रीतयामिति।।
 
3. बत्ताशे आणि खीरीचं नैवेद्य: धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला बताशे आणि खीर अर्पण केल्याने आई लक्ष्मी प्रसन्न होते. अशाने तुमच्या तिजोरीत कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.
 
4. हळदीच्या गाठीमुळे संपत्ती वाढेल: या दिवशी अख्खी हळद खरेदी करणे देखील शुभ असते. शुभ मुहूर्त पाहून बाजारातून पिवळी हळद किंवा काळी हळद गुठळ्यांसह घरी आणावी. कोऱ्या कपड्यावर हळदी ठेवून षडोषोपचाराने पूजा करावी. संपत्ती आणि समृद्धी वाढवण्याचा हा देखील एक मार्ग आहे.
 
5. तिजोरीत सुपारी ठेवा: धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापरही केला जातो. शास्त्रानुसार सुपारी हे ब्रह्मदेव, वरुण देव, यमदेव आणि इंद्रदेव यांचे प्रतीक मानले जाते. पूजेनंतर तिजोरी किंवा कपाटात सुपारी ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील.