दिवाळी फराळ : नारळाची वडी
साहित्य-
1 नारळ खवलेले
350 ग्रॅम साखर
तूप
वेलची पूड
कृती-
दिवाळी विशेष नारळाचा वड्या करण्यासाठी सर्वात आधी कढईत मध्ये दोन चमचे तूप घालावे. आता त्यामध्ये खवलेले नारळ घालावे. तसेच मंद आचेवर परतवून घ्यावे. दोन ते तीन मिनिटानंतर साखर घालून परत परतवून घ्यावे. आता वेलची पूड घालावी. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते. आता एका ताटाला तूप लावून घ्यावे. व हे मिश्रण ताटात काढून घ्यावे. तसेच हे मिश्रण पसरवून घ्या. मिश्रण गरम असतानाच सुरीच्या मदतीने वड्या कापाव्या. नंतर मिश्रण थंड झाल्यावर या वड्या बाऊलमध्ये कडून घ्याव्या. तर चला तयार आहे आपली दिवाळी विशेष नारळाची वडी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik