पाकातले चिरोटे (व्हिडिओ पहा)
साहित्य: 3 वाटी रवा, 1 वाटी मैदा, तेल, 1 वाटी दही, 4 वाटी साखर, 1 वाटी तांदूळाचं पीठ, साजूक तूप, वेलची पूड, चिमूटभर सोडा, आवडत असल्यास खाण्याचा रंग, दूध.
कृती: पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात 2 वाटी पाणी आणि 2 वाटी साखर घालून ते चांगले उकळवा. एकतारी पाक तयार झाला की त्यात वेलची पूड आणि खाण्याचा रंग मिसळून गॅस बंद करा. त्यानंतर प्रथम रवा, मैदा, चिमूटभर सोडा आणि तेलाचे मोहन घालून मिश्रण चांगले एकजीव करा. दूधाने ते मिश्रण पोळीच्या पिठासारखे मळून घ्यावे. वेगळ्या भांड्यात तांदूळाचं पीठ आणि तूप मिसळून मिश्रण तयार करा.
पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करुन त्याची पोळी लाटून घ्या, नंतर त्या लाटलेल्या पोळीवर तांदूळाचं पीठ आणि तूपाचे मिश्रण लावून त्यावर दुसरी पोळी ठेवा. मग त्याचा रोल तयार करा. तयार केलेल्या रोलचे समान आकारात चाकूने तुकडे करून घ्या त्या तुकड्यांना पुन्हा थोडेसे लांबट आकारात हलक्या हाताने चिरोटे लाटा. हे चिरोटे तूपात छान खरपूस तळून घ्या, ते तळलेले चिरोटे आता तयार पाकात सोडा 1 ते 2 तास भिजू द्या. नंतर बाहर काढून घ्या.