testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जाळण्यात आलेल्या मुलाचा मृत्यू

man fire
पुणे| Last Modified शनिवार, 16 जानेवारी 2016 (10:48 IST)
अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या सावन राठोड या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीची बॅटरी चोरल्याच्या संशयावरून कसबा पेठ परिसरात त्याला जाळण्यात आले होते सावन राठोड हा अल्पवयीन मुलगा कसबा पेठ परिसरात उभ्या असलेल्या गाडयांच्या कडेला उभा राहून लघवी करत होता. त्यावेळी काही जणांनी त्याला पाहिले. हा मुलगा गाडयांचा बॅटरी चोर असावा असा स्थानिकांना संशय आला. त्यांनी या मुलाला हटकले व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही जणांनी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले व त्याला पेटवून दिले होते.


यावर अधिक वाचा :