शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे
Written By
Last Modified: पालघर , गुरूवार, 17 जून 2021 (12:41 IST)

महाराष्ट्र: पालघर जिल्ह्यातील डहाणू फटाका कारखान्यात भीषण स्फोट

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला असून त्यामुळे प्रचंड आग लागली आहे. फायर वर्क्स असे या कंपनीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यात आग लागल्यामुळे खळबळ उडाली आहे. डहाणू महामार्गापासून 15 कि.मी. अंतरावर जंगलात हा कारखाना आहे. स्फोटानंतर आगी लागलेल्या आगीत 10 ते 12 कि.मी.पर्यंतच्या परिसरात असलेल्या घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. येथे झालेला स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज 15 ते 20 किमी अंतरावर ऐकू आला.
 
या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि गावकरी घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, “किती लोक आतमध्ये अडकले आहेत याची चौकशी पोलीस करत आहेत.” यासह अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, परंतु मधूनमधून झालेल्या स्फोटांमुळे आगीवर नियंत्रण ठेवणे फारच अवघड झाले आहे. कारखान्याजवळ जाणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.