testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अकरावीचा प्रवेशाचा गोंधळ कायम

- नितिन फलटणकर

नागपूर| वेबदुनिया|

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पर्सेंटाईल प्रवेश प्रक्रियेचा आदेश सरकारने मागे घेतल्यानंतर राज्यातील प्रवेश प्रक्रिया आता सुरू होतील अशी आशा व्यक्त केली जात असतानाच हा गोंधळ अद्यापही संपला नसून याचा निकाल आता गुरुवारी लागणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

स्थानिक विद्यार्थ्यांना जागांमध्ये प्राधान्य देण्यात यावे यासाठी सरकारने अशा स्वरूपाचे आदेश दिले होते. यानंतर एका पालकाने शासनाच्या या निर्णया विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या वर काल मुख्य न्या. स्वतंत्र कुमार आणि ए पी देशपांडे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली असता त्यांनी सरकारला न्यायालयात प्रतिज्ञापात्र सादर करण्याचे आदेश दिले होते.
यानंतर यावरील सुनावणी न्यायालयाने गुरुवार पर्यंत तहकूब केली होती. आता याचा निकाल गुरुवारी होणार असून, पालक आणि सरकारी म्हणणे एकूण घेतल्यानंतरच आता यावरचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :