testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दोन वारसदारांमधील ऐतिहासिक लढत

उस्मानाबाद- | अभिनय कुलकर्णी|
सध्या जामीनावर सुटलेले खा. डॉ. पद्मसिंह पाटील आणि कै. पवनराजे निंबाळकर यांचे वारसदार राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील व ओमराजे निंबाळकर एकमेकांसमोर निवडणूकीसाठी उभे आहेत. या दोन वारसदारांमधील ही ऐतिहासिक लढत आगामी काळातील जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलवणारी ठरेल.

पुनर्रचनेनंतर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील ७२ गावे तुळजापूर मतदारसंघात गेली उर्वरित उस्मानाबादसह कळंब तालुका मिळून नवा उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ तयार झाला. तुळजापूरमध्ये समाविष्ट झालेल्या ७२ गावात डॉ. पद्मसिंह पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. तर नव्याने उस्मानाबादमध्ये सामील झालेल्या कळंब तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओमराजे निंबाळकर यांना मोठा जनाधार आहे.
२००४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकांत डॉ. पद्मसिंह पाटील व कै. पवनराजे निंबाळकर यांचे एकमेकांना कडवे आव्हान होते. या निवडणुकीत या दोघांव्यतिरिक्त सात अपक्ष उमेदवार निवडणुकीत होते. पवनराजे निंबाळकर यांना अपक्ष असताना या निवडणुकीत ६८ हजार ३५० मते मिळाली. तर त्यांचे कट्टर विरोधक पद्मसिंह पाटील यांनी ६८ हजार ८३४ मते घेऊन फक्त ४८४ मतांनी पवनराजे निंबाळकर यांचा पराभव केला. उर्वरित सात अपक्ष उमेदवारांमध्ये १३ हजार १९६ मतांची विभागणी झाली होती.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात २ लाख ९५ हजार ४७० मतदार संख्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातच या मतदार संघात कडवी झुंज होणार हेही निश्चित आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला ७४ हजार ४२५ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ७४ हजार ७७६ मते मिळालेली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसला उस्मानाबादमधून केवळ ३५१ मतांची आघाडी घेता आली. पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरण, खा. डॉ. पद्मसिंह पाटलांना झालेली अटक, अण्णा हजारे यांनी खा. पाटलांविरूध्द नव्याने दाखल केलेली फिर्याद अशा अनेक बाबींमुळे अडचणीत सापडलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेने उमेदवारी देवून ओम राजेनिंबाळकर यांना दिलेले बळ यामुळे या दोन वारसदारांमध्ये होत असलेल्या या अटीतटीच्या ऐतिहासिक लढतीकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


यावर अधिक वाचा :

अशी आहे रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफर

national news
रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफरनुसार आता हा फोन मिळविण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना १,०९५ ...

शासकीय महापूजा मानाचे वारकरी जाधव दांपत्याकडून संपन्न

national news
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी ...

अमेरिकेत कॉल सेंटर घोटाळा, २० भारतीयांना २० वर्षांची शिक्षा

national news
अमेरिकेत करोडो डॉलर्सच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असलेल्या भारतीय वंशाच्या २० जणांना ...

फेसबूक, इंस्‍टाग्रामवर यूजर्सला वयाचा पुरावा द्‍यावा लागणार

national news
फेसबूक आणि इंस्‍टाग्रामने आपल्‍या यूजर्स पॉलिसीमध्‍ये मोठा बदल करण्‍याचे ठरवले आहे. ...

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...

व्हॉट्सअॅपवर मर्यादा, एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता ...

national news
अफवा आणि हत्या रोखण्यासाठी ग्राहकाला एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता येतील अशी ...

‘रेड मी’मोबाईलमधून धूर, कंपनीने तक्रार नाकारली

national news
नांदेडमधील भोकर येथे‘रेड मी’मोबाईलमधून धूर आला. आणि काही क्षणात मोबाईलचा कोळसा झाला. ...

ही 10 अ‍ॅप्स तुमचा स्मार्टफोन करतात हँग

national news
स्मार्टफोन हँग करण्यासाठी किंवा त्याची बॅटरी लवकर संपविण्यासाठी काही अ‍ॅप कारणीभूत ठरतात. ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...