testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात डॉ किन्हाळकर?

नांदेड दि.९ सप्टेंबर (हिं.स)- | अभिनय कुलकर्णी| Last Modified गुरूवार, 10 सप्टेंबर 2009 (11:34 IST)
भोकर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणार असल्याने हा मतदारसंघ येत्या निवडणुकीत लक्षवेधी मतदारसंघ ठरणार आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार मिळणे कठीण असे वाटत असतानाच सर्व विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढण्यासाठी माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर हे चाचपणी करत आहेत. तसे झाल्यास या लढतीत थोडी जान येईल आणि किन्हाळकर यांना दीर्घकालीन उद्देशासाठी ते फायदेशीरही ठरेल असे दिसते आहे.

पुनर्रचनेत मुदखेड गायब
मतदारसंघ पुर्नरचनेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पुर्वीचा मुदखेड मतदारसंघ गायब झाला असून नांदेड व लोहा तालुक्यातील गावे वगळून भोकर तालुका जोडून अर्धापूर, मुदखेड व भोकर असा तीन तालुक्यांचा मिळून नवा भोकर विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. या मतदार संघातून निवडूक लढविण्याची डरकाळी फोडणारे राष्ट्रवादीचे आमदार बापुसाहेब गोरठेकर यांनी गंगाधर कुंटूरकरांसारखी आपली गत होऊ नये म्हणुन भोकरमधून गाशा गुंडाळून नायगावमध्ये पलायन केले आहे . नायगाव मधून लढण्याची त्यांनी जय्यत तयारीही चालविली आहे. त्यामुळे अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात भोकर मतदार संघातून तगडा उमेदवार कोणी शिल्लकच राहिला नाही. होते ते छोटे-मोठे पुढारी अशोकरावांच्या चरणी लीन झाले आहेत. भोकरची जागा सेना-भाजप युतीत सेनेला सुटली असून गेल्या निवडणूकीत ही जागा युतीने शेतकरी संघटनेला सोडली होती. तेव्हा अशोकरावांच्या विरोधात फायरब्रिगेड म्हणून परिचित असलेल्या शेतकरी संघटनेच्या नेत्या शोभा वाघमारे यांनी निवडणूक लढवून अनामत जप्त करुन घेतली होती. त्या आता समाजवादी मानसिकतेतून बाहेर निघून भगवा झेंडा हातात धरुन शिवसेनेचा नारा कुठून बुलंद करतात हे मात्र गुलदस्त्यात आहे.
कुंटुरकरांनी टोपी फिरविली
गेल्या विधानसभा निवडणूकीत मुदखेड मतदारसंघातून अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात त्यांचे ऐककाळचे सहकारी माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार अशी अटकळ बांधण्यात आली होती. त्यामुळे या मतदारसंघात पैशांचा महापूर वाहिला होता व जिल्हाभर या निवडणूकीची चर्चा होती. परंतु, निकालानंतर हवेत असलेल्या गंगाधरराव कुंटूरकरांचे तारे जमिनीवर आले. या गाजलेल्या निवडणूकीत अशोकराव चव्हाण ७० हजारांचे मताधिक्य घेवून निवडून आले तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कुंटूरकर यांना फक्त ३० हजार मतांवरच समाधान मानावे लागले होते. यावेळी तर अशोकराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांची ताकद पुर्वीपेक्षा दहापट वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून राजकीय आत्महत्या कोण करावी असा प्रश्न विरोधी पुढार्‍यांना पडला आहे. गेल्या वेळचे प्रतिस्पर्धी गंगाधरराव कुंटूरकर यांनी बदलती राजकीय हवा बघून लोकसभा निवडणूकीत आपली टोपी फिरवली. राष्ट्रवादीत असले तरीही ते पक्षाच्या कार्यक्रमाऐवजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अधिक दिसत आहेत.
किन्हाळकरांचे गणित
मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवेल असा प्रश्र्न उपस्थित होत असतांना शरद पवारांचे एकेकाळचे विश्वासू मानले जाणारे माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी भोकरमधून निवडणूक लढविण्याचा मनोदय व्यक्त केला असून त्यामागे डॉ.किन्हाळकरांची राजकीय चाल आहे. चव्हाण घराण्याला विरोध करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेते मंडळी जवळपास संपुष्टात आल्यामुळे आपण अशोकरावांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवून पराभूत झालो तरी राज्याच्या राजकारणात आपले नांव होईल व चव्हाण घराण्याला विरोध करणारा कोणी तरी आहे असा संदेश गेल्याने शरद पवार पुन्हा आपल्याला जवळ करुन आपले राजकीय पुनर्वसन करतील असे या मागचे डॉ.किन्हाळकरांचे राजकीय गणित आहे.


यावर अधिक वाचा :

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...

शिवसेनेना सरकारच्या बाजूने मतदान करणार

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला ...

एकमेकांभोवती फिरणार्‍या लघुग्रहांचा शोध

national news
'नासा'ने दोन अशा लघुग्रहांचाशोध लावला आहे, जे एकमेकांभोवती फिरत असतात. प्रत्येकी 900 मीटर ...

जगातील सर्वाधिक उंचीवरचे पोस्ट ऑफिस

national news
देवाची भूमी अशी ओळख असलेल्या हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती व्हॅली मध्ये पर्यटकांना अनेक ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...