रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई आर्टीकल
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (11:49 IST)

श्रीमं‍त होण्यासाठी फेंगशुईचे 7 आयटम

feng shui items
फेंगशुईप्रमाणे घरात या 7 वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्यास आर्थिक भरभराटीसाठी येऊ शकते-
 
कासव : फेंगशुईनुसार घरात कासव ठेवल्यास प्रगतीसोबतच धन-समृद्धीही प्राप्त होते.
 
गोल्डन फिश : धन, प्रतिष्ठा वाढवण्यासाठी घराच्या ड्रॉईंग रूममध्ये गोल्डन फिश ठेवली जाते.
 
बांबू : बांबू हा सुख, शांती आणि समृद्धी देणारा मानला जातो. घरातील कुंड्यात लावता येतो.
 
नाणी: लाल फितीने बांधलेली नाणी दारात टांगल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते.
 
तीन पायांचा बेडूक: असे म्हणतात की तो भाग्यवान असतो. हा बेडूक भाग्य जागृत करतो.
 
विंड चाइम : मुख्य दरवाजावर टांगल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो.
 
क्रिस्टल ट्री : क्रिस्टल ट्री ठेवल्याने सुख-शांती, ऐश्वर्य-समृद्धी आणि मान-सन्मान टिकून राहतो.

Edited by: Rupali Barve