शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

ऑफिस टेबलद्वारे मिळवा सकारात्मक ऊर्जा!

ND
ऑफिस एक अशी जागा आहे जेथे आजकाल लोक घरापेक्षा जास्त वेळ घालवतात. जर तुम्हीपण त्याच लोकांमध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या ऑफिसचा वास्तू जास्त प्रभावित करतो. अशा वेळेस समस्या ही येते की आपण पूर्ण ऑफिसचा वास्तू तर बदलू शकत नाही पण आपल्या ऑफिसच्या टेबलचा वास्तू तर ठीक करूच शकतो. टेबलाला वास्तूच्या अनुरूप ठेवणे जरूरी आहे कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

टेबलावर फेंगशुईचा क्रिस्टल ग्लोब जरुर ठेवून त्याला दिवसातून तीन वेळा फिरवायला पाहिजे. याने तुम्हाला काम करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळेल.
टेबलाची दिशा अशी हवी की पाठ भिंतीकडे असली पाहिजे.
टेबलावर हिरवा, पांढरा किंवा कुठल्याही हलक्या रंगाचा टेबल क्लाथ टाकायला पाहिजे. लाल, काळे असे रंगांचा प्रयोग टाळला पाहिजे.
भिंतीकडे मोठं मोठे पर्वत असलेले चित्र लावायला पाहिजे.
ऑफिसमध्ये डेस्कला असे ठेवायला पाहिजे की तो सरळ दाराकडे नसावा.
ऑफिस टेबलावर उत्तरामध्ये चहा किंवा कॉफीचे कप ठेवायला पाहिजे.
टेबलाच्या पूर्वो-उतर दिशेकडे क्रिस्टलचे पेपरवेट ठेवायला पाहिजे.
कांप्युटरला नार्थ-वेस्टमध्ये ठेवायला पाहिजे.