शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

पडदे हे दिशेचे मूलतत्व आहे!

WD

आपल्या घरातील अथवा कार्यालयातील पडदे व खुर्च्या, सोफे, गाद्यागिरद्या, गालिचे इत्यादी सामान हे आपल्या व्यक्तिगत मूलतत्वाच्या अनुसार बनवता येऊ शकते आणि त्यातून सद्‍भाग्याची प्राप्तीही होऊ शकते.

पडदे जिथे लावायचे आहेत, त्या स्थितीनुसार पडद्याचा रंग आणि त्यावरील नक्षी वेगवेगळी असावी. वास्तविक पाहता, पडदा हा दुपदरी असला पाहिजे. पश्चिम दिशेच्या खोलीचा पडदा हा पांढर्‍या रंगाचा असला पाहिजे. कारण धातू हे या क्षेत्राचे मूलतत्व आहे आणि पांढरा रंग हे धातूचे प्रतीक आहे. अशा प्रकारे उत्तर दिशेच्या खोलीसाठी निळ्या रंगाचे पडदे खूपच उपयुक्त ठरतात. कारण जल हे या क्षेत्राचे मूलतत्व आहे.

घरातील दक्षिण दिशेच्या कोपर्‍यातील पडदा लाल रंगाचा असला पाहिजे आणि त्यावर त्रिकोणाकृती नक्षी असली पाहिजे. कारण लाल रंग हा अग्नी या मूलतत्वाचे प्रतीक आहे. काष्ठ हे पूर्व दिशेचे मूलतत्व आहे. त्यामुळे या दिशेच्या खोलीसाठी हिरव्या रंगाचा आणि आयताकृती नक्षीचा पडदा हितकारक ठरतो.