रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (17:38 IST)

Japan vs Costa Rica: जर्मनील कडून जपानी संघ हरला, आठ वर्षांनंतर कोस्टा रिकाने विश्वचषक सामना जिंकला

आज जपानचा सामना Costa Rica सोबत होता. जपानच्या संघाने त्यांच्या शेवटच्या गट-ई सामन्यात चार वेळा चॅम्पियन जर्मनीचा 2-1 असा पराभव केला होता. त्याचवेळी कोस्टा रिकाचा स्पेनविरुद्ध ७-० असा पराभव झाला. मात्र, या सामन्यात कोस्टा रिकाने जपानचा 1-0 असा धुव्वा उडवला आणि 16 फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. जपानचे फिफा रँकिंग 24 आणि कोस्टा रिकाचे 31 वे आहे.
 
कोस्टा रिकाच्या संघाने 81व्या मिनिटाला गोल करून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जपानच्या अडचणी वाढल्या आहेत. कोस्टा रिकाकडून केसर फुलरने गोल केला. या विश्वचषकात कोस्टा रिकाचा हा पहिला शॉट ऑन टार्गेट होता आणि त्यावर कोस्टा रिकाला गोल मिळाला. 
 
Edited By - Priya Dixit