testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हमशकल्सची धमाल!

hamshakla
Last Modified सोमवार, 5 मे 2014 (13:52 IST)
वीकेंड मुव्हीज या प्रकाराने बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला. त्यातही हॉरर, लव्हस्टोरी, सस्पेन्स अशा अनेक जॉनरचे चित्रपट पाहाला मिळतात. परंतु बर्‍याच दिवसात भरपूर हसवणारा असा एखादा सिनेमा बॉलिवूडकडून आलेला नाहीये. ही उणीव भरून काढाला साजिद खान दिग्दर्शित (हो तोच तो. फराह खानचा भाऊ आणि जॅकलिन फर्नाडिसचा मित्र) हमशकल्स येत्या 20 जूनला प्रदर्शित होतोय. आता सुटय़ा सुरू झाल्यात तेव्हा सिनेमा पटापट प्रदर्शित होतील, त्याच गर्दीतला हा एक चित्रपट आहे. साजिदनं विनोदी कलाकार म्हणून करिअर सुरू केली आणि तो लक्षात राहिला तो त्याच्या हे बेबी, हाऊसफुल-1 व 2 आणि हिम्मतवाला या चित्रपटांसाठी.

अर्थात त्यानं त्यापैकी कोणत्याच चित्रपटात कसदार विनोद प्रेक्षकांना दिलेला नाहीये. आणि तसंही हल्लीच्या विनोदी चित्रपटात अस्सल कॉमेडी काही पाहायला मिळतच नाही. त्यामुळे आगामी हमशकल्स विनोदाच्या कसोटीवर कसा उतरला हे पाहण्यासाठी आता त्याचे यू ट्यूबवर रिलीज झालेले ट्रेलर्स पाहावे लागतील. चित्रपटाचं कास्टिंग तर उत्तम आहे. सैफ अली खान, रितेश देशमुख व राम कपूर या तिघांचे डबल नाही तर चक्क ट्रिपल रोल यात आहेत. त्यामुळे पाहायला धमाल असेल असं सध्या तरी वाटतंय. इतकंच नाही तर सैफअली खान या चित्रपटाकरिता फ्लुएंट गुजराती शिकतो आहे. म्हणजे त्याचे काही कॉमेडी सीन्स गुजराती भाषेत असतील हे नक्की. त्यांच्या जोडीला इशा गुप्ता, बिपाशा बासू आणि तमन्ना आहेत. विनोदी चित्रपट पाहायला आवडणार्‍यांनी हमशकल्सची वाट पाहायला हरकत नाही.


यावर अधिक वाचा :

असा झाला साखरपुडा आणि मेहंदी व संगीताचा कार्यक्रम

national news
बॉलीवूडचे लव्ह बर्ड दीपिका आणि रणवीर सिंह आज इटली मधील लेक कॉमोमध्ये लग्नाच्या बेडीत ...

हसू थोडं, व समजू थोडं

national news
प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते आपणास कळतही नसते डोक्यावर ती केव्हा बसते बायको ...

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चे कलेक्शन खाली आले

national news
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा अगदी तोंडावर पडला आहे. सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे ...

तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !

national news
आईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...

आहेर आणू नका, दान करा दीपिका- रणवीरचे आवाहन

national news
बॉलिवूडमधलं सर्वाधिक लोकप्रिय जोडपं दीपिका- रणवीर इटलीत १४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार ...