बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 मार्च 2018 (13:10 IST)

Movie Review:फक्त राणी मुखर्जीसाठी बघू शकता 'हिचकी'

डायरेक्टर सिद्धार्थ पी मल्होत्रा यांचे चित्रपट 'हिचकी' शुक्रवारी सर्व सिनेमाघरांमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटापासून राणी मुखर्जी स्क्रीनवर कमबॅक करत आहे.
 
कहाणी
यशराज फिल्मच्या बॅनरमध्ये तयार चित्रपट 'हिचकी', हॉलिवूड मूवी 'फ्रंट ऑफ द क्लास'हून प्रेरित आहे. चित्रपटाची कथा नैना माथुरपासून सुरू होत आहे, तिला टॉरेट सिंड्रोम अर्थात बोलण्यात थोडी अडचण होते. त्यामुळे तिला टीचरचे जॉब मिळण्यास थोडा त्रास होतो. पण तिला एका शाळेत नोकरी मिळते आणि 14 झुग्गी-वस्तीच्या मुलांना शिकवण्याची जबाबदारी दिला देण्यात येते. या मुलांना शिकवण्याची जबाबदारी तर नैना घेऊन घेते, पण हे मुलं रोज तिला नवीन नवीन प्रकारे त्रास देण्यास सुरू करतात. काय नैना या मुलांना सुधारण्यात यशस्वी ठरेल, काय हे मुलं नैनाला एक चांगली शिक्षिका बनवण्यास मदत करतील, शाळेच्या प्रिंसिपलचा व्यवहार कसा राहील ? हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावे लागणार आहे.
 
डायरेक्शन
डायरेक्टर सिद्धार्थ मल्होत्राचे चित्रपट 'हिचकी'मध्ये काही नवीन नाही आहे. चित्रपट बघताना पुढे काय होणार आहे हे आधीच कळून येते. चित्रपट गरीब मुलांच्या कथेवर आहे ज्यांना जीवनात काहीच करायचे नसते पण त्यांचे जीवन एक टीचर बदलते. सिद्धार्थ कथेला स्क्रीनवर योग्य प्रकारे मांडू शकले नाही. फिल्म फार काल्पनिक आहे. रोजच्या जीवनात असे काही घडणे फारच अशक्य आहे. चित्रपटाचे क्लायमॅक्स आणि याचे ट्विस्ट देखील फार कमजोर आहे.
 
अॅटिंग
4 वर्षांनंतर राणी मुखर्जी ने चित्रपट 'हिचकी'पासून कमबॅक केले आहे. पूर्ण कथा राणीच्या खांद्यावर आहे. तिनी आपली भूमिका फारच योग्य प्रकारे साकारली आहे. सचिन आणि प्रिया पिळगांवकर यांनी राणीच्या पेरेंट्सची भूमिका साकारली आहे. राणीच्या भावाच्या रोलमध्ये हुसैन दलाल ठीक आहे. भावा बहिणीचे नाते अजून चांगल्याप्रकारे दाखवण्यात येऊ शकत होते.
 
म्युझिक
चित्रपटाचे म्युझिक ठीक-ठाक आहे. चित्रपट रिलीज होण्याअगोदर याचे ऐक गाणे समोर आले होते.
 
बघावे की नाही
जर तुम्ही राणी मुखर्जीचे फॅन असाल तर हे चित्रपट नक्की बघावे.
 
रेटिंग : 3